आदिवासी पट्ट्यात वरई लागवडीला सुरुवात

देवसाने, ता. दिंडोरी : समाधानकारक पाऊस झाल्याने आदिवासी पट्ट्यात वरई (भगर) लागवडीच्या कामाला वेग आला आहे. पाऊस उशिरा झाल्याने हंगाम लांबला आहे.  (छायाचित्र : मुकुंद पिंगळे)
देवसाने, ता. दिंडोरी : समाधानकारक पाऊस झाल्याने आदिवासी पट्ट्यात वरई (भगर) लागवडीच्या कामाला वेग आला आहे. पाऊस उशिरा झाल्याने हंगाम लांबला आहे.  (छायाचित्र : मुकुंद पिंगळे)

नाशिक : जिल्ह्यात इगतपुरी, घोटी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या आदिवासीबहुल भागात वरई पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. चालू वर्षी पावसाला उशिरा सुरवात झाल्याने इतर पिकांप्रमाणे वरई लागवड लांबणीवर पडली होती. लागवडीयोग्य पाऊस झाल्याने रोपे तयार करून वरई लागवडीला सुरुवात झाली आहे.  आदिवासी पट्ट्यात वरई लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. लागवडीसाठी स्थानिक जातींचा वापर केला जातो. या पिकासाठी खते किंवा कीटकनाशके वापरली जात नाहीत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने हे उत्पादन घेतले जाते. हे पीक जास्त पाऊस येणाऱ्या भागातील असल्याने डोंगर उतारावरील भागात, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत लागवड केली जात आहे. लागवडीसाठी एकरी दोन किलो बियाणे वापरले जात असल्याचे येथील आदिवासी शेतकऱ्यांनी सांगितले. या पिकाची लागवड भातापेक्षा वेगळी असून शेतात चिखलामध्ये रोपे टाकून लागवड करण्यात येत आहे. लागवडीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रोपवाटिका केली जाते. रोपे २५ ते ३० दिवसांत तयार होतात. मात्र यावर्षी लागवडी पावसाने पुढे ढकलल्या.  दरम्यान, इगतपुरी, घोटी, दिंडोरी या भागात रोपे तयार करून लागवड सुरू आहे. हे पीक साधारणत: ११० ते १२५ दिवसात तयार होते. त्यामुळे आदिवासी पट्ट्यात घरगुती विक्रीसाठी हे पीक महत्त्वाचे मानले जाते. वरईला भगर असे संबोधले जाते. ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. नाशिकमध्ये वरई पासून बनवण्यात येणाऱ्या भगरच्या जिल्ह्यात ३५ हून अधिक मिल आहेत. म्हणून व्यावसायिकदृष्ट्या या पिकाकडे पाहिले जाते. वरई मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. सुदृढ आरोग्यासाठी तृणधान्य हे महत्त्वाचे आहे, येथील काळू गावित यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com