agriculture news in Marathi curfew impose in state Maharashtra | Agrowon

राज्यात संचारबंदी लागू 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात सोमवारपासून (ता.२३) संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात सोमवारपासून (ता.२३) संचारबंदी लागू करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. 

मुख्यमंत्री म्हणाले, की केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहतील. अन्नधान्य, औषधे, बेकरी, पशुखाद्य, पाळीव प्राणी दवाखाने सुरू राहतील. त्यासंबंधीची वाहतूक सुरू राहील; तसेच कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने आणि वाहतूक सुरूच राहील. मी विनंती करूनही, सांगूनही काहीजण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे. राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद ठेवावीत. मंदिरांमध्ये केवळ पुजारी, मौलवी असतील. 

त्याशिवाय रेल्वे, बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहेत. जर आवश्यकता असेल तर चालक अधिक २ आणि रिक्षामध्ये चालक अधिक १ अशी परवानगी सर्व खासगी वाहनांना दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली, तर आशा आणि अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करून या सेवेसाठी तयार करणार आहोत. सध्या आपण कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहोत. टर्निंग पॉइंटवर आलो आहे. हीच ती वेळ आहे, आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातले आहे, तसेच ते महाराष्ट्रात घालेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

सरकार आपले आहे, आपल्यासाठी काम करतेय. रविवारी जनतेने निश्चयाने घरात राहून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वांनी पाच वाजता टाळ्या थाळ्या, घंटा वाजवल्या; पण टाळ्या वाजवणे म्हणजे व्हायरस पळवणे नाही; तर वैद्यकीय सेवा देणारे आणि पोलिसांना अभिवादन करण्याचा तो एक भाग आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

देशांतर्गत विमान वाहतूक सेवा बंद 
राज्यातील विमानतळेही बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्र लिहिले होते. त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा बंद होणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
सांगली जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटचे क्षेत्र...सांगली  : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणारपुणे  : राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक...
जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
मराठवाड्यात पीककर्ज पुरवठ्याचं घोडं...औरंगाबाद  : कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना कर्ज...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
बा, विठ्ठला.. देशाला कोरोनामुक्त आणि...पंढरपूर, जि. सोलापूर : महाराष्ट्रासह अवघ्या...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
मराठवाड्यात जोरदार पावसामुळे काही...औरंगाबाद : मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
जुन्नर तालुका झाला 'टोमॅटो क्लस्टर'सिंचन सुविधा, लागवडीचे नवे तंत्र आणि जुन्नर कृषी...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...
मसाला पिके, भाजीपाला उत्पन्नाचे नवे साधनरत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये...
मळीवरील निर्यातबंदी उठविलीमुंबई : राज्यात ‘कोरोना’च्या...
कीड- अवशेषमुक्त शेतीमाल निर्यातीसाठी २१...पुणे : भारतीय शेतीमालास जगभरातून मागणी असताना,...
आजपासून कृषी संजीवनी सप्ताहपुणे  : पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे  : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला...
खरीप हंगामासाठी पीकविमा योजना लागूपुणे : शेतकऱ्यांना उत्सुकता लागून असलेल्या...
विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत...संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची...