agriculture news in Marathi curfew in pandhrpur and are in kartiki wari Maharashtra | Agrowon

‘कार्तिकी’च्या काळात पंढरपूरसह परिसरातील दहा गावांत संचारबंदी

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

यंदा कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी चंद्रभागेतील स्नानासह दिंड्यांना पंढरपुरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

सोलापूर : यंदा कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी चंद्रभागेतील स्नानासह दिंड्यांना पंढरपुरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर परिसरातील दहा गावांत २५ आणि २६ नोव्हेंबरला संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकारांना सांगितले. 

श्री. शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. यंदाची कार्तिकी वारी २६ नोव्हेंबरला होत आहे. या वारीसाठी दिंड्या दाखल होऊ देऊ नयेत, असे आदेश विधी व न्याय विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.

त्यामुळे यंदा कार्तिकीसाठी कोणतीही दिंडी पंढरपूरकडे येऊ शकणार नाही, आठ महिन्यांपासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कार्तिकी यात्रेसाठी यंदा नेहमीपेक्षा जास्त संख्येने वारकरी येण्याची शक्‍यता आहे. पंढरपूर शहर, भटुंबरे, चिंचोळी, भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढोण, कौठाळी या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 

कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने गर्दी झाल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येणार नाही. श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवायचे झाल्यास दर्शन रांग २५ किलोमीटरहून अधिक लांब जाईल. पोलिस, आरोग्य आणि अन्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी शासनाकडे यंदाची वारी प्रतीकात्मक असावी असा प्रस्ताव पाठवला होता. त्याची दखल शासनाने घेतली आहे, २१ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत चंद्रभागेत स्नान करण्यास बंदी घालण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले. या वेळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
कार्तिकी वारीची महापूजा परंपरेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात कार्तिकी एकादशीचे सर्व विधी केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासन, पुजारी यांच्यासह मोजक्‍या व्यक्तींनाच त्या वेळी मंदिरात परवानगी देण्यात येणार आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची रॅपिड अँटीजेन कोरोना चाचणी केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
 
यात्रेतील जनावरांचा बाजार रद्द 
दरवर्षी कार्तिकी यात्रेदरम्यान वाखरी (ता. पंढरपूर) येथे भरणारा जनावरांचा बाजारदेखील रद्द करण्यात आला आहे.कार्तिकी यात्रेच्या आधीच आठवडाभर पंढरपुरात दरवर्षी विविध जातिवंत खिलार जनावरांचा मोठा बाजार भरतो. बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने खिलार जनावरे विक्रीसाठी येतात. बाजार रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्रीसाठी बाजारात आणू नयेत, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी केले आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...