परभणीत उद्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी

परभणी ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांअंतर्गंत परभणी महानगरपालिका हद्द आणि ५ किमी परिसर, जिल्हयातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दी, लगतच्या ३ किमी परिसरात बुधवारी (ता.२६) सकाळी सात ते गुरुवारी (ता.२८) मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता.२६) जारी केले. या संचारबंदीतून जिल्ह्यातील सर्व कापूस, तूर, हरभरा केंद्रांना सुट देण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रावर शेतीमालाची खरेदी सुरु राहील.
Curfew in Parbhani till midnight tomorrow

मंगळवारी (ता.२६) सकाळी सात वाजल्यापासून संचारुबंदी लागू झाल्यामुळे परभणी येथील बाजार समितीतील खाजगी शेतमाल खरेदी, कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद होती. पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केट देखील गुरुवार (ता.२८) पर्यंत बंद राहणार आहे. संचारबंदीच्या काळात दूध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जाऊन सकाळी ६ ते ९ या वेळेत दूध विक्री करावी. खत वाहतूक त्यांची गोदामे, दुकाने तसेच त्यांच्यासाठी लागणारी वाहने, कामगार, राष्ट्रीयकृत बँका रास्त भाव दुकानदारांकडून चलनाद्वारे पैसे भरणा करण्यासाठी आदी व्यक्तींना, राष्ट्रीयकृत, सहकारी बॅंकांची ग्रामीण भागातील रोकड घेऊन जाणारी वाहने, व्यक्ती तसेच ग्रामीण भागातील बॅंकांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट देण्यात आली आहे.  भाजीपाला -फळे उत्पादकांचे नुकसान 

परभणी येथील फळे भाजीपाला मार्केट सोमवारी (ता.२५) रमजान ईदच्या सुट्टीमुळे बंद राहिले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.२६) विक्रीसाठी भाजीपाला, फळांची काढणी केली होती. परंतु, संचार बंदी लागू केल्यामुळे या शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे परभणी शहरात, मार्केटमध्ये विक्रीसाठी आणता आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com