agriculture news in marathi, curiosity about next administrator of apmc, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी कोणाची? 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख हे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहे. यानंतर प्रशासकपदी कोणाची वर्णी लागते, याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे. तर देशमुख हे मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या सहकार आणि पणन विभागात सुरू असून, मुदतवाढ मिळणार नसल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देशमुख यांचे मुदतवाढीचे प्रयत्न यशस्वी ठरणार का, याबाबतदेखील चर्चा सुरू आहे. तर प्रशासकपदी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. 

पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख हे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहे. यानंतर प्रशासकपदी कोणाची वर्णी लागते, याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे. तर देशमुख हे मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या सहकार आणि पणन विभागात सुरू असून, मुदतवाढ मिळणार नसल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देशमुख यांचे मुदतवाढीचे प्रयत्न यशस्वी ठरणार का, याबाबतदेखील चर्चा सुरू आहे. तर प्रशासकपदी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. 

पुणे बाजार समितीवर गेली १४ वर्षे प्रशासकीय राजवट आहे. आघाडी आणि सध्याच्या महायुतीच्या काळातील काही कालावधी वगळता प्रशासकीय राजवट कायम आहे. यात सर्वाधिक काम केलेले विद्यमान प्रशासक बी. जे. देशमुख हे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. मात्र देशमुख हे मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या सहकार आणि पणन विभागात सुरू आहे.  

दरम्यान, देशमुख यांना मुदतवाढ न मिळाल्यास प्रशासकपदी कोणीची वर्णी लागणार याबाबतही बाजार समितीसह सहकार आणि पणन विभागात चर्चा सुरू आहे. यामध्ये पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. पणन मंडळ आणि बाजार समिती एकाच परिसरात असल्याने, शिंदे यांना बाजार समितीच्या प्रशासकपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळण्याची शक्यता आहे. शिंदे हे पणन मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या गावातील असल्याने त्याचा फायदादेखील दीपक शिंदे मिळण्याची शक्यता आहे.

या नियमामुळे मुदतवाढ नाही 
१९९५ च्या शासन निर्णयानुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना शासन सेवेत फेरनियुक्ती अथवा मुदतवाढ देण्यास विविध शासन निर्णयांनुसार बंदी घालण्यात आली आहे. या शासन निर्णयांच्या आधारे मुदतवाढ न मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार ज्या पदावर फेरनियुक्ती किंवा मुदवाढ द्यावयाची आहे. ते पद रिक्त होण्यापूर्वी किमान ६ महिने आधी प्रयत्न करूनही पदोन्नती किंवा बदलीद्वारे योग्य कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत, नामनिर्देशद्वारे हे पद भरावयाचे असल्यास आयोगाकडे असे पद रिक्त होण्यापूर्वी ६ महिने अगोदर मागणीपत्र पाठविणे आवश्‍यक असल्याची पहिलीच अट टाकण्यात आली आहे. या अटीनुसार कोणतीही पूर्तता होत नसल्याने मुदतवाढ मिळणे शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

यांची नाकारली होती मुदतवाढ 
जुन्नर (जि. पुणे) बाजार समितीचे तत्कालीन सचिव बाळासाहेब मस्करे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव संचालक मंडळाने पणन संचालकांकडे पाठविला होता. मात्र विविध शासन निर्णय आणि उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार हा प्रस्ताव पणन संचालकांनी फेटाळला होता. मात्र तरीसुद्धा बाजार समितीने उच्च न्यायालयात मुदतवाढीची मागणी केली होती. हा प्रस्ताव उच्च न्यायालयानेदेखील फेटाळला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मस्करे यांच्याकडून सेवानिवृत्तीनंतर दिलेले वेतन, न्यायालयीन खर्च वसुलीची कारवाई जिल्हा उपनिबंधकांनी केली होती. 


इतर ताज्या घडामोडी
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या...उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या...औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या...
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...