agriculture news in Marathi curiosity of banana insurance regulations Maharashtra | Agrowon

केळी विमा निकषांबाबत उत्सुकता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

 राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेचे जाचक निकष लादले गेले आहेत. हे निकष बदलण्यासंबंधी केंद्र सरकारने आपल्या अधिकारांच्या मर्यादेचे कारण सांगून नकार दिला आहे. 

जळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेचे जाचक निकष लादले गेले आहेत. हे निकष बदलण्यासंबंधी केंद्र सरकारने आपल्या अधिकारांच्या मर्यादेचे कारण सांगून नकार दिला आहे. यासंदर्भात आता राज्य सरकारमधील सहा मंत्र्यांच्या उपसमितीला निर्णय घ्यायचा आहे. या उपसमितीची बैठक लवकरच होईल, असे संकेत मिळत आहेत. 

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आदी या उपसमितीमध्ये आहेत. फळ पीक विमा योजनेमध्ये नवे निकष लागू करण्यासंबंधीचे अधिकार केंद्राने राज्य सरकारांना दिले होते. त्याचा शेतकरी हित लक्षात घेऊन किंवा शेतकऱ्यांची नाराजी तयार होणार नाही, याचा विचार करून वापर करण्याची गरज होती. परंतु राज्य सरकारने या योजनेत केळी व डाळिंब पिकासाठी जाचक निकष २०२०-२१ या वर्षासाठी लागू केले. याला शेतकऱ्यांनी विरोध केला व २०१९-२० मध्ये जे निकष होते, तेच लागू करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता शासनाने यासंबंधी सहा मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली. तसेच निकष व इतर कार्यवाहीसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. 
समितीने निकषांबाबत मौन बाळगले होते. समिती कामच करीत नव्हती. केंद्र व राज्य सरकारकडे या समस्येबाबत निवेदनांचा रतीब वाढला. तक्रारी वाढल्या. रोष वाढताच कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने कार्यवाही केली.

मग निकष बदलांबाबतचा अहवाल तयार केला व तो मान्यतेसाठी केंद्राला पाठविला. परंतु केंद्र सरकारला जे अधिकारच नव्हते, त्याची मागणी या अहवालाद्वारे शासनाने केली. या अहवालात केळी व डाळिंबासह इतर फळ पिकांबाबतचे निकष बदलण्याची मागणीही केली. इतर फळ पिकांबाबतचे निकष बदलण्याची मागणीच नव्हती, तरीदेखील ही मागणी केली.

केंद्र सरकारला यासंदर्भात निकष बदलाचे किंवा धोरणात्मक बाबींमध्ये लागलीच निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने केंद्राने हा प्रस्ताव नाकारला. आता राज्य शासनाच्या उपसमितीला यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. या उपसमितीची लवकरच बैठक होणार आहे.

निकष शेतकऱ्यांना मारक
केळी व डाळिंब पिकांसाठी विमा संरक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केळी व डाळिंबाला प्रतिकूल वातावरणाचा मोठा फटका बसतो. अनेक शेतकरी विमा परताव्यांसाठी पात्र ठरतात. या योजनेत केळी व डाळिंबासंबंधी परताव्यांचा अधिकचा निधी राज्य सरकारला द्यावा लागतो. यामुळेच की, काय यंदा जाचक निकष लावले. परतावेच शेतकऱ्यांना मिळणार नाहीत व मोठा निधी विमा कंपनीला नफ्याच्या रुपात मिळेल, अशी व्यवस्था नवे जाचक निकष लागू करताना करण्यात आली, असा मुद्दा खानदेशातील केळी उत्पादक उपस्थित करीत आहेत. तसेच नवे निकष शेतकरी पूरक किंवा २०१९-२० या वर्षात जसे होते, तसेच लागू न केल्यास या योजनेवर खानदेशात बहिष्कार टाकण्याची भूमिका केळी उत्पादकांनी घेतली आहे.

प्रतिक्रिया
विमा योजना शेतकरी पूरक असावी की, विमा कंपनीपूरक, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा. राज्यकर्ते जनतेतून निवडून जातात. हेदेखील, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. केळी पिकासाठी २०१९-२० चे निकष लागू केले नाही, तर या योजनेवर बहिष्कार टाकू.
- विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर (ता.रावेर, जि.जळगाव)


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...