agriculture news in Marathi curiosity of new ceo of FSSIA Maharashtra | Agrowon

‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी उत्सुकता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी पदावरून (सीईओ) पवनकुमार अग्रवाल यांची बदली झाली आहे. त्यामुळे नव्या ‘सीईओ’कडे दूध उद्योगाचे लक्ष लागून आहे. 

श्री. अग्रवाल आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव झाले आहेत. राज्यातील दूध तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील घटकांचे लक्ष सतत प्राधिकरणाकडे लागून असते. कारण, या संस्थेकडे दूध व कृषी प्रक्रिया क्षेत्रातील विविध उत्पादनांची मानके ठरविली जातात. त्यामुळे नवा ‘सीईओ’ कोण? याविषयी डेअरी उद्योगाला उत्सुकता लागून आहे. 

पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी पदावरून (सीईओ) पवनकुमार अग्रवाल यांची बदली झाली आहे. त्यामुळे नव्या ‘सीईओ’कडे दूध उद्योगाचे लक्ष लागून आहे. 

श्री. अग्रवाल आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव झाले आहेत. राज्यातील दूध तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील घटकांचे लक्ष सतत प्राधिकरणाकडे लागून असते. कारण, या संस्थेकडे दूध व कृषी प्रक्रिया क्षेत्रातील विविध उत्पादनांची मानके ठरविली जातात. त्यामुळे नवा ‘सीईओ’ कोण? याविषयी डेअरी उद्योगाला उत्सुकता लागून आहे. 

प्राधिकरणाचे नेतृत्व आधी युधिरसिंग मलिक या आयएएस अधिकाऱ्याकडे होते. त्यांनी मॅगी विक्रीवर बंदी आणून देशभर खळबळ उडवून दिली होती. अर्थात, बंदी प्रकरण मलिक यांना महागात पडले. त्यांची एक वर्षात उचलबांगडी झाली. 2015 पासून श्री. अग्रवाल यांच्याकडे ‘सीईओ’पद आले. त्यांनी मात्र, केंद्राची मर्जी सांभाळत या पदावर मुदतवाढ मिळवली.

देशात दुधाची भेसळ वाढत असताना श्री. अग्रवाल यांनी दूध उद्योगाची बाजूला लावून धरली. “भेसळीबाबत अकारण बाऊ केला जातोय. अप्रमाणित नमुने केवळ सात टक्के नमुने आढळले आहेत. बाजारपेठेतील दूध अतिशय सुरक्षित आहे,” असा दावा प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी केला होता.

मात्र, दूध व दुग्धजन्य पदार्थांसाठी नवी मानके प्राधिकरणाने लागू केली. त्यामुळे डेअरी उद्योगाच्या तांत्रिक समस्येत वाढ झाली आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिजैविकेयुक्त दूध नाकारण्याची भूमिका अलीकडे काही डेअरीचालकांनी घेतली. त्यामुळे ‘एफएसएसएआय’ची नियमावलीच कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. 

“डेअरी उद्योगाला अजूनही अफ्लॉटॉक्सिन तसेच प्रतिजैविकांची समस्या भेडसावते आहे. प्राधिकरणाने याबाबत काही कडक नियमावली जारी केली आहे. अर्थात नियम पाळले जात नाही म्हणून कडक कारवाईची भूमिका श्री. अग्रवाल यांनी ठेवलेली नव्हती. त्यामुळे नवे ‘सीईओ’ काय भूमिका घेतात? याविषयी आम्हांला उत्सुकता आहे,” अशी माहिती डेअरी उद्योगातील सूत्रांनी दिली. 

राज्य शासनाचा विभाग अजूनही झोपेत
देशात विविध बदल होत असताना दुग्धव्यवसाय विकास विभाग झोपेत आहे. http://dairy.maharashtra.gov.in/honble_ministers या संकेतस्थळावर नवे बदल सोडाच; पण स्वतःचे पालकत्व सांभाळणारे मंत्री, अधिकारी कोण? हेदेखील सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे दुग्धविकासमंत्री म्हणून महादेव जानकर तर राज्यमंत्री म्हणून अर्जुन खोतकर यांचेच नाव कायम आहे. तसेच सचिव म्हणून ए. एल. जरहाड यांचा उल्लेख कायम आहे.


इतर ताज्या घडामोडी
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...