विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची उत्सुकता

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची उत्सुकता
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची उत्सुकता

मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याबाबत राज्यात मतदारांमधील उत्सुकता शिगेला पोचली आहे. आज (ता. २१) किंवा फारतर रविवारी (ता. २२) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

बाराव्या आणि तेराव्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता चौदाव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा लांबल्याचे दिसते. बाराव्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम ३१ ऑगस्ट २००९ रोजी तर तेराव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबर २०१४ रोजी झाली होती. नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान ३५ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यातच पुढील महिन्यात दिवाळी आहे. 

निवडणुकीची घोषणा करताना भारत निवडणूक आयोगाला त्याचाही विचार करावा लागणार आहे. मात्र, अद्यापही आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे आचारसंहिता कधी लागणार याबाबतची सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिताही लागू होते. 

येत्या दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. तसेच, प्रत्येक मतदारसंघातील आरक्षण लक्षात घेऊन आपआपले उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यातील काही उमेदवार जाहीर करून यात आघाडी घेतली आहे. 

तर लोकसभेच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असून लवकरात लवकर तो जाहीर करू, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवेसना भवनात नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com