Agriculture news in marathi Currant production season is in its final stage in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

सांगली ः कोरोना विषाणूच्या अभुतर्पूव संकटातही बेदाणा उत्पादन अडथळ्यातून मार्ग काढत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा चालू हंगाम दीड महिना अधिक सुरू राहिला. येत्या दहा ते पंधरा दिवसांत बेदाणा निर्मितीचा हंगाम विसावेल, अशी माहिती बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा निर्मिती शेड मालकांनी दिली. 

सांगली ः कोरोना विषाणूच्या अभुतर्पूव संकटातही बेदाणा उत्पादन अडथळ्यातून मार्ग काढत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा चालू हंगाम दीड महिना अधिक सुरू राहिला. येत्या दहा ते पंधरा दिवसांत बेदाणा निर्मितीचा हंगाम विसावेल, अशी माहिती बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा निर्मिती शेड मालकांनी दिली. 

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यात प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. यंदा महापूर, अतिवृष्टी अशा संकटाची मालिका द्राक्ष उत्पादकांच्यावर सुरू होती. त्यामुळे द्राक्ष हंगाम उशीरा सुरू झाला. मुळात बेदाण्याचा हंगाम डिसेंबर महिन्यातच सुरू होतो. परंतु या नैसर्गिक आपत्तीच्या फटक्‍याने बेदाणा हंगाम उशीरा सुरू झाला. वास्तविक पाहता हंगाम उशीरा सुरू झाला तरी, एप्रिल मध्यावर हंगाम संपला जातो. दरवर्षी सुमारे या परिसरात ५ ते ६ हजार शेडवर बेदाणा तयार होतो. 

हंगाम सुरळीत सुरू होता. दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बेदाणा निर्मितीवर संकट आले. तसेच द्राक्ष विक्रीवर थांबली. परिणामी टेबलग्रेप्स थेट बेदाणा शेडवर येऊ लागली. त्यामुळे कवठेमहांकाळ परिसरात गतवर्षीपेक्षा चालूवर्षी एक ते दीड हजार शेडची संख्या वाढली, अर्थात सात हजार शेडवर बेदाणा तयार झाला. 

तासगाव, मिरज, पलूस भागात बेदाणा निर्मिती 
द्राक्षे काढणीला होती. परंतु वाहतूक बंद असल्याने द्राक्षे विक्री करता येत नव्हती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीसाठी पुढाकार घेतला. वास्तविक पाहता, पूर्वी या पट्ट्यात बेदाणा निर्मिती केली जायची. परंतु इथला शेतकरी द्राक्षाची निर्यात करू लागल्याने बेदाणा तयार करण्याचे बंद केले. मात्र, आर्थिक तोटा होऊ नये यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी बंद असलेले बेदाण्याच्या शेडची दुरुस्ती करुन पुन्हा बेदाणा तयार केला. 

यंदा बेदाण्याचे उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षीपेक्षा चालु वर्षी हंगाम एक महिना अधिक चालला. बेदाण्याचे सौदे बंद आहेत. सौदे कधी सुरू होतील याची वाट पाहतोय. 
- सुनील माळी, बेदाणा शेड मालक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी 
केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...