दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात २१० रुपये उच्चांकी दर 

दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये २१० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.
Currants after Diwali holidays A high of Rs 210 in the deal
Currants after Diwali holidays A high of Rs 210 in the deal

सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये २१० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला. शुक्रवारी (ता.२६) सौद्यात ३० गाड्यांतून ३०० टन बेदाणा आवक झाली होती. सुटीनंतरच्या पहिल्या सौद्यासाठी उत्साह दिसून आला.  दिवाळीपूर्वी झालेल्या बेदाण्याचे संपूर्ण पेमेंट पूर्ण व्हावे. व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी शून्य पेमेंटची संकल्पना जवळपास १५ वर्षांपासून राबवली जाते. यंदा १६ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु काही व्यापाऱ्यांकडील येणे-बाकी कोट्यवधी रुपयांची होती. त्यामुळे त्यांचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी बेदाणा व्यापारी संघटनेने बैठक घेऊन इशारा दिला. त्यामुळे अपवाद वगळता शून्य पेमेंटची प्रक्रिया पूर्ण होऊन शुक्रवारी (ता.२६) मार्केट यार्डात बेदाणा सौदा घेण्यात आला.  पहिल्याच दिवशी १६ दुकानांमध्ये ३० गाड्यांतून ३०० टन बेदाणा आवक झाली होती. सौद्यात चांगल्या उच्च प्रतीच्या बेदाण्यास १८० ते २१० रुपये प्रति किलो, तर मध्यम प्रतीच्या बेदाण्यास १४० ते १८० रुपये दर मिळाला. कमी प्रतीच्या काळ्या बेदाण्यास ४० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळाला. यंदा अवकाळी पावसाने द्राक्ष बागाचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर वाढतील, असा अंदाज बेदाणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.  दरम्यान, सांगलीतील सौद्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून, त्यांनी बेदाणा व इतर शेतीमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती दीनकर पाटील व सचिव महेश चव्हाण यांनी केले. या वेळी मनीष मालू, शेखर ठक्कर, राजू कुंभार, विनित गड्डे, गगन अग्रवाल, पवन चौगुले, विनायक हिंगमिरे, हिरेन पटेल, राजू शेटे, रवी हजारे, आस्की सावकर, दिगंबर यादव, सचिन चौगुले, कुमार दरुरे, देवेंद्र करे, श्रवण मर्दा, दगडू कचरे आदी व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com