Agriculture News in Marathi Currants after Diwali holidays A high of Rs 210 in the deal | Page 2 ||| Agrowon

दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात २१० रुपये उच्चांकी दर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये २१० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.

सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये २१० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला. शुक्रवारी (ता.२६) सौद्यात ३० गाड्यांतून ३०० टन बेदाणा आवक झाली होती. सुटीनंतरच्या पहिल्या सौद्यासाठी उत्साह दिसून आला. 

दिवाळीपूर्वी झालेल्या बेदाण्याचे संपूर्ण पेमेंट पूर्ण व्हावे. व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी शून्य पेमेंटची संकल्पना जवळपास १५ वर्षांपासून राबवली जाते. यंदा १६ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु काही व्यापाऱ्यांकडील येणे-बाकी कोट्यवधी रुपयांची होती. त्यामुळे त्यांचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी बेदाणा व्यापारी संघटनेने बैठक घेऊन इशारा दिला. त्यामुळे अपवाद वगळता शून्य पेमेंटची प्रक्रिया पूर्ण होऊन शुक्रवारी (ता.२६) मार्केट यार्डात बेदाणा सौदा घेण्यात आला. 

पहिल्याच दिवशी १६ दुकानांमध्ये ३० गाड्यांतून ३०० टन बेदाणा आवक झाली होती. सौद्यात चांगल्या उच्च प्रतीच्या बेदाण्यास १८० ते २१० रुपये प्रति किलो, तर मध्यम प्रतीच्या बेदाण्यास १४० ते १८० रुपये दर मिळाला. कमी प्रतीच्या काळ्या बेदाण्यास ४० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळाला. यंदा अवकाळी पावसाने द्राक्ष बागाचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर वाढतील, असा अंदाज बेदाणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी सांगितले. 

दरम्यान, सांगलीतील सौद्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून, त्यांनी बेदाणा व इतर शेतीमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती दीनकर पाटील व सचिव महेश चव्हाण यांनी केले. या वेळी मनीष मालू, शेखर ठक्कर, राजू कुंभार, विनित गड्डे, गगन अग्रवाल, पवन चौगुले, विनायक हिंगमिरे, हिरेन पटेल, राजू शेटे, रवी हजारे, आस्की सावकर, दिगंबर यादव, सचिन चौगुले, कुमार दरुरे, देवेंद्र करे, श्रवण मर्दा, दगडू कचरे आदी व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
 


इतर बातम्या
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...