सीताफळाचा फळपीक विमा योजनेत समावेश

जालना : ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेळोवेळी विविध स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. २०२१-२२ व २३ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सीताफळ या फळपिकाचा नव्यानेच समावेश करण्यात आला आहे.
Custard apple crop Included in the insurance plan
Custard apple crop Included in the insurance plan

जालना : ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेळोवेळी विविध स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. २०२१-२२ व २३ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सीताफळ या फळपिकाचा नव्यानेच समावेश करण्यात आला आहे. ‘ॲग्रोवन’ने सीताफळ उत्पादकांच्या या मागणीला सातत्याने प्रकाशात आणले होते हे विशेष.

या संदर्भातील माहितीनुसार १८ जून २०२१ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशात जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३८ महसूल मंडळांसह राज्यातील अमरावती, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, परभणी, पुणे, बीड, बुलडाणा, लातूर, वाशीम व सोलापूर या चौदा जिल्ह्यातील काही महसूल मंडळांत ही योजना राबविण्यात येईल. 

तीन वर्ष उत्पादनक्षम वय असलेल्या सीताफळ बागायतदारांना मृग बहारसाठी आपल्या बागेचा विमा काढता येणार आहे. १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत पावसाचा खंड सलग १५ दिवस राहिल्यास हेक्टरी ९,९०० रुपये व सलग २० दिवस खंड राहिल्यास १६,५०० रुपये, सलग २५ दिवस खंड राहिल्यास ३३,०००, तर १ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जास्त पाऊस अर्थात १ दिवस ४० मि.मी. झाल्यास ८,८००,  सलग २ दिवस प्रतिदिन ४० मि.मी.पाऊस झाल्यास २२,००० रुपये असे एकूण हेक्टरी ५५ हजाराचे विमा संरक्षण असेल.

जालन्यासह परभणी, लातूर जिल्ह्यांची जबाबदारी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला देण्यात आली आहे. विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा २७५० रुपये आहे. ३१ जुलै या अंतिम मुदतीपर्यंत शेतकरी आपला विमा प्रस्ताव सादर करू शकतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com