सीताफळाचा फळपीक विम्यात समावेश करा

सीताफळाचा फळपीक विम्यात समावेश करा
सीताफळाचा फळपीक विम्यात समावेश करा

बीड : जिल्ह्यातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीच्या निमित्ताने झपाट्याने विस्तारत असलेल्या सीताफळाच्या लागवडीला विमा संरक्षणाचा लाभ असावा, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पिकाचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्याची मागणी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात बीड जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.

सीताफळाचा फळपीक विम्यात समावेश नाही. त्यामुळे त्याचा विमा उतरविता येत नाही. मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड झाली आहे व होत आहे. त्यामुळे सीताफळाचा पीक विम्यात समावेश करावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी बंडू काशीद, राजाभाउ काशीद, शेख अनसर अहमद, महारूद्र काशीद, गोरख नरवडे, विष्‍‌णू हातोटे, बाळू शेळके, बाबू भोसले, महारूद्र तळेकर, बाळू माने, डॉ. शेळके आदींनी केली आहे. 

शिवाय या शेतकऱ्यांना शासनाचे अनुदानही मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सीताफळाची लागवड विमा लागू होण्यासाठीच्या अपेक्षित क्षेत्राइतकी नाही, ते जंगली फळपीक आहे. पावसाच्या पाण्यावरच ते येते. आदी कारणामुळे विमा लागू न होण्यामागे असल्याची  सांगण्यात येत असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. २०११-१२ च्या गणनेनुसार राज्यात  जवळपास ५२ हजार ७०३  हेक्‍टरवर सीताफळाची लागवड झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर सीताफळाची लागवड पाहता त्या क्षेत्राच्या तुलनेत किमान क्षेत्र दुप्पट झाली असण्याची शक्‍यता उत्पादकांनी व्यक्‍त केली.

२०११-१२ च्या आकडेवारीनुसार औरंगाबाद व लातूर या मराठवाड्यातील दोन कृषी विभागात अनुक्रमे ८७७० व ६५९६ मिळून जवळपास १५ हजार ३६६ हेक्‍टरवर सीताफळाची लागवड झाल्याचे समोर आले होते. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २६०३ हेक्‍टर, जालना १४४२ हेक्‍टर, बीड ४७१९ हेक्‍टर, लातूर ६४६ हेक्‍टर, उस्मानाबाद २१०२ हेक्‍टर, नांदेड २२४४ हेक्‍टर तर हिंगोली जिल्ह्यात ९० हेक्‍टरवर सीताफळाची लागवड झाली होती. इतर विभागाचा विचार करता पुणे विभागात १५ हजार ८६ हेक्‍टर, नाशिक विभागात ६ हजार ६७२ हेक्‍टर, कोकण विभागात ३४ हेक्‍टर, कोल्हापूर विभागात ५४८६ हेक्‍टर, अमरावती विभागात ८ हजार ९०६ हेक्‍टर, तर नागपूर विभागात ११५३ हेक्‍टरवर सीताफळाची रोहयो फलोत्पादन व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत लागवड झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com