Agriculture news in Marathi Custard apple processing industry should be encouraged | Agrowon

सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन द्यावे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

सीताफळाची आवक वाढली आणि बाजारपेठेत दर कमी-अधिक होत राहिले. याचा मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सीताफळ प्रक्रीया उद्योगांसाठी प्रोत्साहन तसेच पायाभूत सुविधांची शासनाकडून निर्मिती केली जावी, अशी मागणी सीताफळ उत्पादकांमधून केली जात आहे.

अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ही बाब एकीकडे उत्साहवर्धक मानता येणारी असतानाच दुसरीकडे सीताफळावर प्रक्रीया करणारे उद्योग तुलनेने नगण्य असल्याचा फटका उत्पादकांना बसत आहे. यंदा आॅक्टोबरच्या सुरुवातीला सातत्याने पावसाळी वातावरण होते. याच काळात सीताफळाची आवक वाढली आणि बाजारपेठेत दर कमी-अधिक होत राहिले. याचा मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सीताफळ प्रक्रीया उद्योगांसाठी प्रोत्साहन तसेच पायाभूत सुविधांची शासनाकडून निर्मिती केली जावी, अशी मागणी सीताफळ उत्पादकांमधून केली जात आहे.

राज्यात सीताफळाची लागवड ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पोचली आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या या फळबागेला जंगली प्राण्यांचा कमी त्रास, इतर फळांच्या तुलनेत व्यवस्थापनावर कमी खर्च व शाश्‍वत उत्पादन या काही कारणांमुळे विदर्भातील शेतकरी ही सीताफळ लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे विदर्भात सीताफळाचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे.

दरवर्षी सीताफळ फळबागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत या फळाची आवकही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढते. यंदा सीताफळ काढणीला आले त्याच काळात पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण होते. अशावेळी फळबागांमधील फळे एकाचवेळी पिकायला सुरुवात झाली. एकीकडे फळ पिकत असताना बाजारात दुर्दैवाने तितका उत्साहवर्धक उठाव नव्हता. काही ठिकाणी कोरोनाच्या कारणाने ग्राहकांनी फळांना पसंती टाळली. यातून मार्ग काढत काही शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत फळे पोचविण्याचा प्रयत्नही केला. परंतु बाजारपेठेत योग्य भाव मात्र मिळाला नसल्याचे उत्पादक सांगत आहेत. पावसामुळे यंदा फळधारणाही कमी झाली होती. त्यामुळेही नुकसान झेलावे लागले.

सीताफळ विक्रीसाठी अकोला व्हावे हब
सीताफळाची अकोला ही एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. येथे विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून विक्रीला येतात. हंगामात दर दिवसाला किमान दीड ते दोन हजार क्रेटपर्यंत आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. शासनाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...