agriculture news in marathi Custard apple seed separator | Agrowon

सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी यंत्र

ऋषिकेश माने, गणेश गायकवाड
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सीताफळाचा गर व बिया वेगळे करण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामधून काढलेल्या गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला चांगला बाजारभाव मिळतो.

सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत नाही. काढणीनंतर बाजारपेठेत त्वरित विक्री होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना विक्रीची घाई असते. त्याचा फायदा घेऊन व किंचिंतही आवक वाढताच दरामध्ये प्रचंड घसरण होते. यामुळे सीताफळावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.

प्रक्रियेमुळे बिगर हंगामात सीताफळाचा आस्वाद घेणे शक्य होते. सीताफळ प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने गराचा वापर केला जातो. सीताफळ गरापासून तयार केलेल्या मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड अशा पदार्थांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. मात्र, सीताफळाचा गर आणि बिया वेगळे करण्यासाठी मजुरांचा वापर करावा लागतो. आजकाल मजुरांची उपलब्धता कमी असल्यामुळे मजुरीमध्ये वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे खाद्य पदार्थांशी संबंधित असल्यामुळे स्वच्छता हा घटक महत्त्वाचा असतो. अधिक माणसांचा वावर असल्यास स्वच्छता पाळणे तुलनेने अवघड होते. या सामान्य अडचणींवर मात करण्याच्या उद्देशाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सीताफळाचा गर व बिया वेगळे करण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामधून काढलेल्या गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला चांगला बाजारभाव मिळतो.

यंत्राची कार्यप्रणाली

  • पिकलेल्या सीताफळांचे मधून दोन समान भाग करावेत. एका मोठ्या चमच्याने दोन्ही भागांतील गर बियांसहित काढून घ्यावा.
  • बियांसहित वेगळा केलेला गर एका मोठ्या क्रेटमध्ये काढावा. आणि उरलेली साल किंवा टरफले वेगळी करून घ्यावीत.
  • यंत्रामध्ये बियांसहित वेगळा केलेला गर टाकावा. यंत्रामध्ये गर आणि बिया वेगवेगळ्या झालेल्या दिसतील.

यंत्राची वैशिष्ट्ये 

  • हे यंत्र ०.५ अश्वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटारवर चालते.
  • या यंत्राचा वापर सोपा असल्यामुळे अकुशल किंवा कुशल मजुराद्वारे चालवणे शक्य होते.
  • यंत्रापासून प्रतितास ७०-८० किलो गर वेगळा करता येतो. गर वेगळे करण्याची प्रक्रिया जलद होते.
  • यंत्राची गर वेगळा करण्याची क्षमता ९२-९६ टक्के आहे.
  • गर काढण्याच्या प्रक्रियेत मानवी हाताळणी कमी राहते. परिणामी गराची प्रत चांगली राहते.

गराची साठवणूक

  • वेगळा केलेला गर जास्त काळ टिकून राहण्यासाठी गर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून डीप फ्रीजमध्ये उणे २० अंश सेल्सिअस तापमान साठवून ठेवावा.
  • अस्कॉर्बिक आम्ल (२००० पीपीएम) किंवा पोटॅशिअम मेटा बायसल्फाईटचा (१५०० पीपीएम) वापर करून सीताफळ गर ६ महिन्यांपर्यंत टिकवता येतो.

संपर्क- ऋषिकेश माने, ९४०३१२९८७२
(आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर टेक्नोवन
जनुकीय सुधारित पिकांसाठी अधिक...विविध पिकांमध्ये जनुकीय सुधारित जातींची भर पडत...
सूक्ष्म हवामानासाठी वारा प्रतिबंधक सजीव...थंड किंवा उष्ण वाऱ्यामुळे पिकाचे किंवा पशुधनाचे...
काटेकोर शेतीसाठी सापेक्ष आर्द्रतेचा...सापेक्ष आर्द्रता किंवा वातावरणातील बाष्प आणि पीक...
शेतीकामावेळी उडणाऱ्या धूलिकणांपासून करा...शेतीमध्ये विविध यंत्रे, अवजारांचा वापर करताना...
काकडीच्या सालापासून पर्यावरणपूरक...खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी...
शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरशेतीसमोरील समस्यांमध्ये बदलते हवामान, मजुरांची...
अल्पभूधारक शेतकऱ्यांने तयार केले छोटे...कोविड १९ च्या काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगाचे...
काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा...पॉलिहाऊस, शेडनेट यासारख्या संरक्षित शेतीमध्ये...
स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्ररब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, साळ, हरभरा,...
महिलांसाठी शेतीपयोगी अवजारेसुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या...
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...
न रडवणारा गोड कांदा!कांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...
संपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...