Agriculture news in marathi, Custard apple in the state is Rs.1000 to Rs.14000 per quintal | Agrowon

राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सीताफळांची आवक बऱ्यापैकी राहिली. पण मागणी असल्याने त्याचे दर टिकून राहिले. सीताफळाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक पाच हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सीताफळांची आवक बऱ्यापैकी राहिली. पण मागणी असल्याने त्याचे दर टिकून राहिले. सीताफळाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक पाच हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सीताफळांची आवक रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. सीताफळाची आवक मोहोळ, बार्शी, पंढरपूर, माढा भागातून झाली. गेल्या काही दिवसांपासून सीताफळाला मागणी वाढते आहे. पण मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने दर टिकून आहेत. सीताफळाला प्रतिक्विंटलला किमान दोन हजार रुपये, सरासरी तीन हजार रुपये आणि सर्वाधिक पाच हजार रुपये इतका दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवक काहीशी अशीच प्रतिदिन ३० ते ४० क्विंटलपर्यंत होती. तर दर प्रतिक्विंटलला किमान २२०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक साडेपाच हजार रुपये इतका होता. त्या आधीच्या पंधरवड्यातही आवकेचे प्रमाण असेच राहिले. तर दर प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये असा दर मिळाला. किरकोळ ३०० ते ५०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर काहीसे स्थिर आणि टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

पुण्यात प्रतिक्विंटलला २००० ते १४००० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३०) सीताफळांची सुमारे १० ते १२ टन आवक झाली. या वेळी प्रतिकिलोला २० ते १४० रुपये दर होता. तर गोल्डन वाणाला ४० ते १५० रुपये दर असल्याची माहिती सीताफळाचे आडतदार युवराज काची यांनी दिली. 

बाजार समितीमध्ये सासवड, पुरंदर, सातारा, वडकी, यवत, आसवली या गावांतून सीताफळांची आवक होत आहे. सध्याचा हंगाम हा मध्यावधीवर आला आहे. आवक, मागणी आणि दर संतुलित असल्याचे काची यांनी सांगितले.  हा हंगाम डिसेंबरअखेर सुरू राहील आणि आवक वाढणार आहे. ही आवक सरासरी १५ ते २० टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यातील हंगामात प्रक्रिया उद्योगाकडून खरेदी वाढेल आणि दर स्थिर राहतील, असा अंदाजही काची यांनी व्यक्त केला.

अकोल्यात प्रतिक्रेटला २५० ते १६०० रुपये

अकोला ः या हंगामातील नवीन सीताफळांची आवक सुरु झाली आहे. काही सीताफळ हे डोंगरदऱ्यांमधील येत आहेत. तर बहुतांश सीताफळे बागांमधील आहेत. डोंगरदऱ्यांमधील सीताफळ २५० ते ४०० रुपये क्रेट दराने विकत आहे. तर बागांमधील फळ ५०० रुपयांपासून १६०० रुपयांदरम्यान प्रतिक्रेट विक्री होत आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

येथील बाजारात सीताफळांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. यंदाचा सीताफळाचा हंगाम सुरु झाला. या ठिकाणी प्रामुख्याने दोन प्रकारातील फळे विक्रीला येत आहेत. डोंगरदऱ्यातील 
सिताफळाचा आकार लहान असल्याने त्याचा दर साधारणपणे २५० रुपयांपासून, तर ४०० रुपये प्रतिक्रेटपर्यंत मिळत आहे. 

जळगावात क्विंटलला २५०० ते ४५०० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३०) ११ क्विंटल सीताफळांची आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये मिळाला. दर्जेदार सीताफळांचे दर बऱ्यापैकी होते. आवक जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, औरंगाबाद, जालना भागांतून होत आहे. 

सीताफळाची फारशी लागवड जिल्ह्यात झालेली नाही. जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आदी भागांत लागवड आहे. औरंगाबादमधील सोयागाव, सिल्लोड, फुलंब्री आदी भागांतही लागवड आहे. या भागातून अधिकची आवक बाजारात होते. दर शनिवारी अधिकची आवक बाजारात होते. दरही टिकून आहेत. कमी दर्जाच्या सीताफळांच्या दरात मात्र चढ-उतार होत असतो. या महिन्यात आवक स्थिर राहिली आहे. पुढे आवक वाढू शकते. यंदा पीकही जोमात आहे, असे सांगण्यात आले.

नगरमध्ये क्विंटलला १००० ते ६००० रुपये

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सीताफळांची आवक सुरू झाली आहे. येथे दर दिवसाला १५ ते २० क्विंटल सीताफळांची आवक होत आहे. दर १ हजार ते सहा हजार रुपये आहे. तर सरासरी दर ३ हजार ५०० रुपये मिळत आहे. हा दर गेल्या पंधरा दिवसापासून स्थिर आहे. 

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून सीताफळांची आवक होत आहे. २७ सप्टेंबर रोजी १५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते सहा हजार व सरासरी ३ हजार ५०० रुपये, २५ सप्टेंबर रोजी १४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते सहा हजार, तर सरासरी ३ हजार ५०० रुपये, २३ सप्टेंबर रोजी ११ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते सात हजार, तर सरासरी ४ हजार, १७ सप्टेंबर रोजी १० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते सहा हजार, तर सरासरी ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. पुढील आठवड्यात अजून आवकेत वाढ होणार असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नागपूरमध्ये क्विंटलला १५० ते १५०० रुपये क्रेट 

नागपूर : शेतकऱ्यांव्दारे उत्पादित त्यासोबतच आदिवासींद्वारे जंगलातून संकलित होणाऱ्या सीताफळांची स्थानिक फुले मार्केटमध्ये आवक वाढली आहे. दररोज सरासरी १५०० क्रेटची आवक होत आहे, अशी माहिती व्यापारी प्रकाश गडपायले यांनी दिली.

फुले मार्केटमध्ये सीताफळांची होणारी ही आवक अमरावती तसेच नागपूर जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगल भागातून मोठ्या प्रमाणावर होत आहे. आदिवासी जंगलातून फळे संकलित करतात व बाजारात पाठवतात. यातून त्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो.

फळांच्या दर्जानुसार सीताफळाला प्रतिक्रेट  १५० ते १५०० रुपयांचा दर मिळत आहे. ग्राहकांकडून मोठ्या आकाराच्या फळांना मागणी राहते. ही फळे ३०० ते ४०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची राहतात, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. किरकोळ बाजारात सीताफळांची प्रतिकिलो विक्री १०० ते २५० रुपये किलो या प्रमाणे होत आहे. सप्‍टेंबरअखेर ते नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत सीताफळांची बाजारातील आवक राहते. काही शेतकरी सीताफळाची थेट विक्री करतात. त्यांना सरासरी २०० रुपये किलो, असा दर मिळतो.

नाशिकमध्ये क्विंटलला १५०० ते ४००० रुपये 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) सीताफळांची आवक ४५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५००  ते ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता. २८) सीताफळांची आवक ६५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये मिळाला. सोमवारी (ता. २७) आवक झाली नाही. शनिवारी (ता. २५) आवक ५० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० मिळाला. शुक्रवारी (ता.२४) आवक ४५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० मिळाला.

गुरुवारी (ता.२२) आवक १४० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत सीताफळांची आवक सर्वसाधारण होती. आवकेत चढ उतार दिसून आले; मात्र दर स्थिर राहिल्याचे दिसून आले.

परभणीत प्रतिक्विंटलला १००० ते ४००० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.३०) सीताफळांची २०० क्रेट (४० क्विंटल) आवक होती. सीताफळांना प्रतिक्रेट किमान २०० ते कमाल ८०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये (प्रतिक्विंटल किमान १००० ते कमाल ४००० रुपये तर सरासरी २५०० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसांपासून येथील मार्केटमध्ये कंधार, गंगाखेड तालुक्यातून तसेच स्थानिक परिसरातून दररोज सीताफळांची २०० ते ३०० क्रेट आवक होत आहे. सीताफळांना सरासरी प्रतिक्रेट १०० ते ८०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.३०) सीताफळांची २०० क्रेट आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर 
प्रतिक्रेट १०० ते ८०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी मो. ईसा यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये डाळिंबाचा दर मागणीमुळे टिकूननाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कांदा २०० ते ४५०० रुपये क्विंटलजळगावात क्विंटलला १४०० ते २४०० रुपये ...