agriculture news in marathi, Custard apple sustainable production can be possible through technical cultivation | Agrowon

तांत्रिक लागवडीतून सीताफळाचे शाश्वत उत्पादन शक्य

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

जाफराबाद, जि. जालना : कायमस्वरूपी अवहेलना झालेल्या सीताफळ या फळपिकाचं भविष्य आता उज्ज्वल आहे. त्याची तांत्रिक पद्धतीने लागवड झाल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न मिळू शकते, असे प्रतिपादन ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख श्री. संजय मोरे पाटील यांनी केले.

जाफराबाद, जि. जालना : कायमस्वरूपी अवहेलना झालेल्या सीताफळ या फळपिकाचं भविष्य आता उज्ज्वल आहे. त्याची तांत्रिक पद्धतीने लागवड झाल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न मिळू शकते, असे प्रतिपादन ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख श्री. संजय मोरे पाटील यांनी केले.

जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथे गुरुवारी(ता. ९) पार पडलेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघातील संलग्न शेतकऱ्यांच्या नियमित मासिक चर्चासत्रात श्री. मोरे बोलत होते. गटशेती, सीताफळ लागवड, व्यवस्थापन, ब्रॅंडिंग, मार्केटिंग, प्रक्रिया उद्योग आदी विषयांवर त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजरत्न गायकवाड, काळेगावचे सरपंच वसंत चव्हाण, चेअरमन बाबुराव पिंपळे, माजी सरपंच मनोहर चव्हाण, भानुदास डोईफोडे, आनंद शेळके, विजय चव्हाण, कृषी सहायक डी. ई. घुगे, भाऊराव दरेकर, भाऊराव आटफळे यांची उपस्तिथी होती.

तत्पूर्वी शिवारफेरी करण्यात आली. त्यात ठिबक, बेडवरील अद्रक व फिनोलेक्स प्लॅसॉन यांच्या सौजन्याने गटशेतीतील शेतकरी विनोद पिंपळे यांच्या शेतात सबसरफेज ड्रीप ऊस पीक पाहणी कार्यक्रम झाला. शाहीर दिलीप पिंपळे यांनी प्रास्ताविक व संचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद पिंपळे, गणेश शेंडगे, अमोल जाधव, रामेश्वर तायडे, प्रदीप अहिरे यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...