Agriculture news in marathi Customers in Parbhani will get vegetables along with groceries online | Agrowon

परभणीतील ग्राहकांना किराणासह भाजीपाला ऑनलाइन मिळणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

परभणी शहरातील नागरिकांनी पीबीएन शॉप अॅपला चांगला प्रतिसाद दिला आहे. शुक्रवार (ता.२४) पर्यंत या अॅपमध्ये ५८६ नागरिकांनी नोंदणी केले. १६५ ऑर्डर्स भरल्या असून त्या पैकी बुधवार (ता.२२) पर्यंत १३१ ऑर्डर घरपोच देण्यात आल्या. 
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी. 

परभणी : जीवनावश्यक किराणा मालाची गरज लक्षात घेऊन परभणी शहरातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून ‘पीबीएन शॉप’ हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याद्वारे आता किराणा मालासोबतच भाजीपाला देखील ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. 

या अॅपमध्ये भाजीपाला नावाचा स्वतंत्र विभाग आहे. सध्याच्या अॅप धारकांना ही सुविधा वापरासाठी नव्याने डाऊनलोड करावयाची आवश्यकता नाही. त्यांना फक्त त्यांच्याकडील अॅप अपडेट करावे लागेल. नवीन डाउनलोड करणाऱ्यांना सुधारीत आवृत्तीच डाऊनलोडद्वारे उपलब्ध होईल. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप विनामूल्य उपलब्ध आहे. अँड्रॉइड मोबाईल धारक हे अॅप वापरू शकतील. संगणकावर www.pbnshop.in द्वारे देखील ही प्रणाली वापरता येईल. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ही सेवा पुरविण्यात येत आहे. त्यासाठी मॅप ऑन कंपनीचे सीईओ सचिन देशमुख, प्रवीण बाळासाहेब देशमुख यांच्यातर्फे ही सेवा विनामूल्य देण्यात आली. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ) जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संगणक प्रणालीचा विकास केला आहे. 

किराणा मालाप्रमाणेच भाजीपाल्याची ऑर्डर दिल्यानंतर २४ तासाच्या आत घरपोच सेवा मिळेल. ऑर्डर देताना नागरिकास त्याचा मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता स्पष्टपणे नमूद करावयाचा आहे. भाजीपाल्याच्या भावातील चढ- उतार लक्षात घेता ऑर्डर देताना नागरिकांना त्यांच्या भाजीपाल्याची अंदाजित किंमत अॅपमध्ये दिसते. परंतु, प्रत्यक्ष बाजारात असलेल्या किंमतीत तफावत असू शकते. परंतु, ऑर्डर घरपोच देताना प्रत्यक्ष बाजारपेठेतील दराप्रमाणे पावती देण्यात येईल. त्यानुसार रक्कम अदा करावयाची आहे. घरपोच सेवा पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या स्वयंसेवकांतर्फे ही सेवा विनामुल्य मिळेल. त्यासाठी कोणतीही अधिकची रक्कम बिलात लावण्यात येणार नाही. 

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...