पाण्याअभावी लिंबू बागेवर कुऱ्हाड

पाण्याअभावी लिंबू बागेवर कुऱ्हाड
पाण्याअभावी लिंबू बागेवर कुऱ्हाड

धुळे : टंचाईमुळे पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या दोन एकरातील लिंबू बागेवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ कापडणे (ता.धुळे) येथील शेतकरी आत्माराम पाटील यांच्यावर आली आहे. त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. 

नुकसानीसंबंधी पंचनामा करण्यासाठी तलाठी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधला; परंतु पंचनाम्यासाठी ते आलेच नसल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील यांची २५ एकर शेती आहे. भाजीपाला, कांदा, बोरांची उत्तम शेती ते करतात. त्यांच्याकडे दोन कूपनलिका आहेत. यातील एक कूपनलिका आटली. दुसरीचे पाणी कमी झाले. कांदा, भाजीपाला व बोरांची बाग वाचविण्यासाठी मोठी धावपळ झाली. अशातच लिंबू बागेकडे दुर्लक्ष झाले. 

पाच एकर बोरांची बाग आहे. या बागेतून पुढे चांगला हंगाम मिळण्यासाठी सिंचन करून घेणे आवश्‍यक होते. या बागेच्या सिंचनात अधिक दिवस व पाणी लागले. त्यात लिंबू बागेचे नुकसान झाले. लिंबूची २० बाय २० फूटांवर लागवड केली होती. पाण्याअभावी हंगामही हाती आला नाही. अलीकडेच त्यांनी झाडे जेसीबीच्या साह्याने काढून घेतली. ती तशीच पडून आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com