Agriculture news in marathi Cut off sugarcane by sending three hundred fifty bullock carts | Agrowon

पावणेतीनशे बैलगाड्या पाठवून उसाची तोडणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

खोची, जि. कोल्हापूर : शरद सहकारी साखर कारखान्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागातील ऊस तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत येथील बुडीत क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी सलग दोन दिवस सुमारे पावणेतीनशे बैलगाड्या एकाच वेळी तोडणीसाठी पाठविल्या होत्या. याबद्दल शरद सहकारी साखर कारखान्याच्या बुडीत क्षेत्रातील ऊस उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

खोची, जि. कोल्हापूर : शरद सहकारी साखर कारखान्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागातील ऊस तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत येथील बुडीत क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी सलग दोन दिवस सुमारे पावणेतीनशे बैलगाड्या एकाच वेळी तोडणीसाठी पाठविल्या होत्या. याबद्दल शरद सहकारी साखर कारखान्याच्या बुडीत क्षेत्रातील ऊस उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठचे क्षेत्र पाण्याखाली गेले होते. येथील ऊस पुरामुळे खराब झाला होता. उसाचे वाढे पुरात वाहून गेल्यामुळे उसाला ढिशा फुटल्या आहेत. येणाऱ्या उत्पादनात घटीमुळे हा ऊस लवकर गाळपास जाण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु, ऊसतोडणी कामगारांची बुडीत क्षेत्रातील ऊस तोडण्याची तयारी नव्हती.

यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीपासून ऊस अजून शेतात पडलेल्या अवस्थेत उभाच होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाराचा वापर करण्याची वेळ आली. ऊस उत्पादकांच्या अवस्थेचा विचार करून शरद सहकारी साखर कारखान्याच्या वतीने येथे बुडीत क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवली. सलग दोन दिवस साधारण तीनशे बैलगाड्या फक्त या क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी पाठविल्या. सुमारे ८० एकरहून अधिक एकर क्षेत्रातील ऊस तोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील उत्पादकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री व शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, मुख्याधिकारी बी. ए. आवटी यांचे मार्गदर्शन लाभले. शेती मदतनीस प्रसाद बाबर, राजकुमार जांभळे व भागाधिकारी महावीर ऐनापुरे यांनी परिश्रम घेतले. 

 


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...