'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे चक्रव्यूह'

'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे चक्रव्यूह'
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे चक्रव्यूह'

भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी केला जात नसून, अनेक जाचक अटी उत्पादकांवर लादण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, या अटी तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केली आहे.  जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी खचला असून, त्याला आधाराची गरज आहे. मात्र, जेव्हा शेतकरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी जात आहे. त्या वेळी केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना खरेदीसाठी विविध अटी आणि नियम सांगितले जात आहेत.  या अटी, नियमाच्या आधारे शेतकऱ्यांचे धान खरेदीस नकार देण्याचे प्रकारही घडत आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. काही ठिकाणी अद्यापही केंद्र सुरू झाले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, व्यापारी अशा भागात कमी दराने धानाची खरेदी करीत आहेत. शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, पाखड धानाची खरेदी करण्यात यावी आणि धान खरेदीसाठी लावलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करण्यात याव्या, शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे, अशा मागण्यांचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com