नीरा डावा कालव्यातून आवर्तन

नीरा डाव्या कालव्यातून ‘टेल टू हेड’ पद्धतीने उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनास सुरुवात झाली आहे. उन्हाळी हंगामासाठी ८.६३ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.
नीरा डावा कालव्यातून आवर्तन Cycle through the Nira left canal
नीरा डावा कालव्यातून आवर्तन Cycle through the Nira left canal

वालचंदनगर, जि. पुणे : नीरा डाव्या कालव्यातून ‘टेल टू हेड’ पद्धतीने उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनास सुरुवात झाली आहे. उन्हाळी हंगामासाठी ८.६३ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.  

पाटबंधारे विभागाने रब्बीच्या हंगामामध्ये शेतीच्या सिंचनाचे योग्य नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेमध्ये पाणी उपलब्ध झाले. तसेच, १.२१७ टीएमसी पाण्याची बचत ही झाली आहे. सध्या उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनास सुरुवात झाली असून, ‘टेल टू हेड’ पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार आहे. उन्हाळी हंगामासाठी  ८.६३ टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये इंदापूर, बारामती व पुरंदरमधील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळणार आहे. 

कालवा सलग सुरू राहणार   नीरा डावा कालवा १ मार्च रोजी सुरू झाला होता. रब्बीचे आवर्तन संपल्यानंतर कालवा बंद न करता सुरू ठेवण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने प्रयत्न केले. त्यामुळे उन्हाळी हंगामाचे पाणी वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन संपल्यानंतर ३० जून रोजी कालवा बंद होईल. सलग १२२ दिवस कालवा सुरू राहणार असल्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

प्रतिक्रिया उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळून सिंचन पूर्ण करावे. ‘टेल टू हेड’ पद्धतीने सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार आहे.   - राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

असा होणार लाभ असा होणार लाभ    

  • पाण्याची तरतूद    ८.६३ टीएमसी
  • आवर्तन कालावधी    १२२ दिवस
  • इंदापूर तालुका    २२ हजार ८७० हेक्टर
  • बारामती तालुका    १३ हजार ७८० हेक्टर 
  • पुरंदर तालुका    ४२० हेक्टर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com