agriculture news in Marathi cyclone affected to kokan coastal line Maharashtra | Agrowon

कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

तौत्के’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. वादळीवाऱ्यांसह पावसाची संततधार सुरू असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. वादळीवाऱ्यांसह पावसाची संततधार सुरू असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत शेकडो घरांचे नुकसान झाले. पिकांनाही तडाखा बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक इमारतीचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये सकाळपासून जोरदार वारे आणि पाऊस सुरू होता. त्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरील काही घरांची किरकोळ पडझड झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनाऱ्यावरील आंबोलगड, माडबन, सागवे, अवळीची वाडी येथील काही घरांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. 

कशेळी, दांडे अनसुरे, दले, मिठगवाणे, सागवे येथे घरावर झाड कोसळून घरांचे किरकोळ नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डोंगर येथे रस्त्यामध्ये झाड कोसळून रस्ता वाहतूक बंद झाली होती. हरपुडे येथे झाड उन्मळून पडले. भलेमोठे झाड हे बुधाजी घुग आणि पांडुरंग घुग यांच्या घरावर हे झाड पडले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी घराचं मोठं नुकसान झाले. तसेच कोंडगाव चावडी जवळ झाड कोसळून सीताराम मोरे यांच्या चिकन दुकानाचे नुकसान मोठे नुकसान झाले. 

संभाव्य धोका लक्षात घेऊन अवळीची वाडी येथील ३५, आंबोलगड येथील ६८ कुटुंबातील २५४ लोक, माडबन येथील २० घरामधील ७८ लोक, सागवे येथील ६२ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. वादळाच्या अनुषंगाने तहसीलदार प्रतिभा वराळे या सातत्याने त्या त्या भागातील प्रशासनासह लोकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी सूचना देत होत्या. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी दोन वाजल्यानंतर जिल्ह्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. देवगड निपाणी या राज्यमार्गावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्‍‍प झाली. अनेक ठिकाणी वीजखांब, विजवाहिन्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवसभर विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. 

किनाऱ्यावरील गावांना तडाखा 
किनारी भागातील गावांना यांचा चांगला तडाखा बसला असून, मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्राला उधाण आले आहे. अजस्र लाटा किनाऱ्यावर फुटत आहेत. रत्नागिरीत वेगवान वारे वाहू लागलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येणार आहे. 

घरांचे नुकसान 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाने सह्याद्री पट्ट्यातील गावांना तडाखा दिला. वैभववाडी तालुक्यातील ७० हून अधिक घरांचे या वादळात नुकसान झाले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय कणकवली तालुक्यात १५, दोडामार्ग तालुक्यात १०, सावंतवाडी तालुक्यात ६, मालवण तालुक्यात ३, वेंगुर्ला तालुक्यात ३, घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...