agriculture news in marathi Cyclone Burevi to hit Tamil Nadu on Dec 4 | Agrowon

‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली; उद्या तामिळनाडूला धडकणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, पुढील दोन, तीन दिवस त्यांचा प्रभाव राहणार आहे. चार डिसेंबरला ते तामिळनाडूनला धडकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून चक्रीवादळाची साखळी सुरूच आहे. बुधवारी (ता. २) पुन्हा ‘बुरेवी’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, पुढील दोन, तीन दिवस त्यांचा प्रभाव राहणार आहे. चार (उद्या) डिसेंबरला ते तामिळनाडूनला धडकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

भारताच्या दक्षिण भागात ताशी ९० ते १०० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडणार असून, मत्स्य व्यावसायिकांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.

गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. त्यांची तीव्रता वाढत जाऊन त्यांचे रूपांतर मंगळवारी रात्री (ता.१) बुरेवी या चक्रीवादळामध्ये झाले. हे चक्रीवादळ पश्‍चिम वायव्य भागाकडे सरकत असून, बुधवारी (ता. २) ताशी १५ किलोमीटर वेगाने वारे होते.

श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून पूर्व दक्षिणपूर्व भागात २४० किलोमीटर अंतरावर होते. तर पाम्बनपासून पूर्व दक्षिण पूर्व भागाकडे ४७० किलोमीटर, कन्याकुमारीपासून पूर्व ईशान्य भागाकडे ६५० किलोमीटर अंतरावर होते. सायंकाळी या चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाऊन श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पश्‍चिम वायव्य भागाकडे जमिनीवरून अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताशी ८० ते ९० किलोमीटर ते जास्तीत जास्त १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.

आज (गुरुवारी) ते वादळ गल्फ, मन्नार आणि कोमोरिन परिसरातून पश्‍चिम व्यायव्येकडे सरकत असून, उद्या (ता. ४) कन्याकुमारी आणि पाम्बनकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. शनिवारपर्यंत (ता. ५) दक्षिण तमिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशाची किनारपट्टी, माहे आणि कराईकल आणि दक्षिण उत्तर केरळ, लक्षद्वीप या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील पारा दहा अंशांवर
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ उत्तरेकडील थंड वाऱ्यासह बाष्प खेचत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भात काही भागांत थंड वारे वाहत असल्याने या भागात गारठा वाढू लागला आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. बुधवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

बुधवारी (ता. २) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई (सांताक्रूझ) २३.२ (३), ठाणे २५, अलिबाग २२.४ (३), रत्नागिरी २२.४ (१), डहाणू २२.८ (३), पुणे १६.९ (५), जळगाव १६ (३), कोल्हापूर १९.१ (३), महाबळेश्‍वर १५ (१), मालेगाव १७ (४), नाशिक १६.५ (३), निफाड १५.५, सांगली १८.१ (२), सातारा १७.२ (३), सोलापूर १६.५, औरंगाबाद १६.२ (३), परभणी १४ (-१), परभणी कृषी विद्यापीठ ११.५, नांदेड १६.५ (३), उस्मानाबाद १५.४ (१), अकोला १६.२ (१), अमरावती १६.१, बुलडाणा १६.२ (१), चंद्रपूर १८.२(४), गोंदिया १०.६ (-३), नागपूर १३.८(३), वर्धा १६.४, यवतमाळ १५.


इतर अॅग्रो विशेष
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...