नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
बातम्या
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली; उद्या तामिळनाडूला धडकणार
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, पुढील दोन, तीन दिवस त्यांचा प्रभाव राहणार आहे. चार डिसेंबरला ते तामिळनाडूनला धडकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून चक्रीवादळाची साखळी सुरूच आहे. बुधवारी (ता. २) पुन्हा ‘बुरेवी’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, पुढील दोन, तीन दिवस त्यांचा प्रभाव राहणार आहे. चार (उद्या) डिसेंबरला ते तामिळनाडूनला धडकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
भारताच्या दक्षिण भागात ताशी ९० ते १०० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडणार असून, मत्स्य व्यावसायिकांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. त्यांची तीव्रता वाढत जाऊन त्यांचे रूपांतर मंगळवारी रात्री (ता.१) बुरेवी या चक्रीवादळामध्ये झाले. हे चक्रीवादळ पश्चिम वायव्य भागाकडे सरकत असून, बुधवारी (ता. २) ताशी १५ किलोमीटर वेगाने वारे होते.
श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून पूर्व दक्षिणपूर्व भागात २४० किलोमीटर अंतरावर होते. तर पाम्बनपासून पूर्व दक्षिण पूर्व भागाकडे ४७० किलोमीटर, कन्याकुमारीपासून पूर्व ईशान्य भागाकडे ६५० किलोमीटर अंतरावर होते. सायंकाळी या चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाऊन श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पश्चिम वायव्य भागाकडे जमिनीवरून अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताशी ८० ते ९० किलोमीटर ते जास्तीत जास्त १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
आज (गुरुवारी) ते वादळ गल्फ, मन्नार आणि कोमोरिन परिसरातून पश्चिम व्यायव्येकडे सरकत असून, उद्या (ता. ४) कन्याकुमारी आणि पाम्बनकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. शनिवारपर्यंत (ता. ५) दक्षिण तमिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशाची किनारपट्टी, माहे आणि कराईकल आणि दक्षिण उत्तर केरळ, लक्षद्वीप या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील पारा दहा अंशांवर
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ उत्तरेकडील थंड वाऱ्यासह बाष्प खेचत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भात काही भागांत थंड वारे वाहत असल्याने या भागात गारठा वाढू लागला आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. बुधवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
बुधवारी (ता. २) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई (सांताक्रूझ) २३.२ (३), ठाणे २५, अलिबाग २२.४ (३), रत्नागिरी २२.४ (१), डहाणू २२.८ (३), पुणे १६.९ (५), जळगाव १६ (३), कोल्हापूर १९.१ (३), महाबळेश्वर १५ (१), मालेगाव १७ (४), नाशिक १६.५ (३), निफाड १५.५, सांगली १८.१ (२), सातारा १७.२ (३), सोलापूर १६.५, औरंगाबाद १६.२ (३), परभणी १४ (-१), परभणी कृषी विद्यापीठ ११.५, नांदेड १६.५ (३), उस्मानाबाद १५.४ (१), अकोला १६.२ (१), अमरावती १६.१, बुलडाणा १६.२ (१), चंद्रपूर १८.२(४), गोंदिया १०.६ (-३), नागपूर १३.८(३), वर्धा १६.४, यवतमाळ १५.
- 1 of 1496
- ››