'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला धडकले

बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले.
'गुलाब' चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले
'गुलाब' चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले

पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. आज (ता. २७) ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत आहेत.

बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २४) तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढल्याने शनिवारी (ता. २५) रात्री 'गुलाब' चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनाऱ्याकडे वेगाने झेपावणारे चक्रीवादळ ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणम दरम्यान धडकली. ही प्रणाली जमिनीवर येण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

त्यामुळे पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात उंच लाटा उसळण्यास सुरवात झाली. तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे.  चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणामध्ये स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रात दोन दिवस जाणवणार प्रभाव जमिनीवर आल्यानंतर वादळाची तीव्रता ओसरणार असून, आज (ता. २७) ही प्रणाली विदर्भापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दोन दिवस प्रभाव जाणवणार आहे, या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात सोमवारी (ता. २७) विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात, तसेच मंगळवारी (ता. २८) कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com