चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा जोरदार तडाखा

बंगालच्या उपसागरात आलेल्या गुलाब चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. सोमवार (ता. २७)पासून सूरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने मराठवाड्यात अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे.
The cyclone hit the state hard
The cyclone hit the state hard

पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या गुलाब चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. सोमवार (ता. २७)पासून सूरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने मराठवाड्यात अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. मंगळवारीही (ता. २८) अनेक जिल्ह्यांत पावसाचा दणका सुरूच होता. 

वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा मराठवाड्याला बसला असून, नांदेड, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे सर्वाधिक १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील धारूर, अंबाजोगाई, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुखेड, धर्माबाद, बिलोली, कंधार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात ही पावसाने चांगलाच जोर धरला होता. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासूनच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला होता. 

मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :  मध्य महाराष्ट्र : जळगाव : भाडगाव १०८, भुसावळ ४९, बोधवड ५२, चाळीसगाव ८२, जामनेर ७०, मुक्ताईनगर ४८, पाचोरा ६०, कोल्हापूर : गगणबावडा ६९, नाशिक : गिरणाधरण ५३, सटाना ४२, सुरगाणा ५१, सोलापर : बार्शी ४२. मराठवाडा : औरंगाबाद : कन्नड ८०, खुलताबाद ७५, सोयगाव १३१, बीड : अंबाजोगाई १०७, बीड ७९, धारूर ११२, केज ७६, परळी वैजनाथ ७३, हिंगोली : औंढा नागनाथ ५८, हिंगोली ६२, वसमत ७२, जालना : अंबड ७७, बदनापूर ५०, भोकरदन ७०, लातूर : अहमदपूर ५०, औसा ७५, चाकूर ९६, जळकोट ८४, लातूर ५८, निलंगा ५४, रेणापूर ५०, शिरूर अनंतपाळ ६०,  नांदेड : अर्धापूर १२९, भोकर ८५, बिलोली १०८, देगलूर ६१, धर्माबाद ११५, हदगाव ६०, हिमायतनगर ६४, कंधार १०८, लोहा ९२, मुदखेड ८८, मुखेड १२३, नायगाव खैरगाव ६९, नांदेड १०५, उमरी ९१, उस्मानाबाद : कळंब १००, उस्मानाबाद ७०, तुळजापूर ६२, परभणी : मानवत ५१, पालम ७१, पूर्णा ५६.  विदर्भ : बुलडाणा : मातोळा ४८, नांदुरा ४८, चंद्रपूर : जेवती १०३. गडचिरोली : सिरोंचा ४६, यवतमाळ : अर्णी ५६, दिग्रस ५१, घाटंजी ४४, महागाव ४९, पुसद ४१, उमरेड ५४, यवतमाळ ४१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com