agriculture news in Marathi cyclone impact on state Maharashtra | Agrowon

वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. यामुळे समुद्रातील पाण्याच्या उंच लाट उसळत असून, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई परिसरांत पावसासह वारे वेगाने वाहत आहे.

पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. यामुळे समुद्रातील पाण्याच्या उंच लाट उसळत असून, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई परिसरांत पावसासह वारे वेगाने वाहत आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक जोरदार वारे वाहत आहे. हे चक्रीवादळ आज (ता.१७) मुंबईजवळून जाणार असून, मंगळवारी गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी दुपारी ‘तौत्के’ वादळाचे केंद्र गोव्याच्या पणजीपासून पश्‍चिमेकडे १२० किलोमीटर, रत्नागिरी व राजापूरपासून १०२ किलोमीटर, मुंबईपासून दक्षिणेकडे ४२० किलोमीटर, तर गुजरातच्या वेरावळपासून ६६० किलोमीटर अंतरावर होते. या वादळाची तीव्रता आणखी वाढून मंगळवारी (ता.१८) पहाटेपर्यंत पोरबंदर आणि महुवा (जि. भावनगर) दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत. 

‘तौत्के’ वादळाच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे समुद्रात ताशी १४५ ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ७५ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.

गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळ आणि पावसामुळे घरांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीपिके आणि फळझाडांनाही फटका बसणार आहे. वादळ प्रभावित भागात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आज मुंबईजवळून जाणार 
आज (सोमवारी) सकाळी हे चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास २०० किलोमीटर अंतरावरून गुजरातच्या दिशेने सरकेल. महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे दिशेने वाटचाल करत असलेले हे वादळ मंगळवारी गुजरातच्या पोरबंदरजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्याला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

वादळाचा परिणाम 

  • रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दोन दिवसांपासून पाऊस 
  • विजेचे खांब कोसळून पडून वीजपुरवठा खंडित 
  • झाडे रस्त्यांवर पडून वाहतूक ठप्प 
  • सिंधुदुर्गमध्ये ४० घरांचे नुकसान 
  • तीन शाळांचे नुकसान झाले. 
  • नगर, औरंगाबाद, जालना, नाशिक जिल्ह्यांत पाऊस 
  • पुणे जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस 

इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...