agriculture news in Marathi cyclone incidences increased this year Maharashtra | Agrowon

चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढला

संदीप नवले
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी त्याच्या संख्येत यंदा झालेली वाढ निश्‍चितच चिंताजनक आहे. जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मॉन्सून मार्गावर दीर्घकालीन परिणाम केला.

पुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी त्याच्या संख्येत यंदा झालेली वाढ निश्‍चितच चिंताजनक आहे. जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मॉन्सून मार्गावर दीर्घकालीन परिणाम केला. खरीप लागवडीवर झाला. यानंतरही चार चक्रीवादळे आली, त्यांनी खरीप काढणी प्रभावित केली. याशिवाय सततच्या ढगाळ वातावरणाने फळबागांचे मोहर, फुलोरा आणि रोगराई नियंत्रणाचे गणित बिघडवले. बुरेवी अजून तमिळनाडूत दाखल होतच आहे, तत्पूर्वीच आज (ता. ४) पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. 

हवामान बदलाचा परिणाम म्हणून चक्रीवादळ निर्मितीत झालेली वाढ सांगितली जात असली, तरी हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी याबाबत ‘ॲग्रोवन’शी सविस्तर वार्तालाप केला. डॉ. सानप म्हणाले, ‘‘मे महिन्यापासून आतापर्यंत पाच चक्रीवादळे भारताच्या सीमेवर धडकली आहेत. आगामी मे महिन्यापर्यंत चक्रीवादळे तयार होण्याचे संकेत आहेत. मात्र ते कधी होईल हे नक्की सांगता येत नाही. साधारणत: चक्रीवादळ तयार होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर त्यांचे अंदाज हवामान विभागाकडून दिले जातात.’’ 

प्रतिक्रिया
चक्रीवादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षी ते तयार होत असल्याने पूर्व, दक्षिण व पश्‍चिम भारताच्या किनारपट्टीजवळील राज्यांना या चक्रीवादळाचा धोका अधिक असतो. यासंबधी काही वर्षांपासून भारतीय हवामान विभागाकडून दिले जाणारे अंदाजाची अचूकता वाढली आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी खूप कमी झाली आहे.
— डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...