Agriculture news in Marathi Cyclone Jawad forms in the Bay of Bengal | Page 2 ||| Agrowon

बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाची निर्मिती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 डिसेंबर 2021

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने ‘जवाद’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. आज (ता. ४) ही वादळी प्रणाली किनाऱ्याजवळ येण्याची शक्यता असून, तिची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने ‘जवाद’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. आज (ता. ४) ही वादळी प्रणाली किनाऱ्याजवळ येण्याची शक्यता असून, तिची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. किनाऱ्याजवळ येताच हे चक्रीवादळ ईशान्य दिशेकडे वळून, उद्या (ता. ५) ओडिशाच्या पूरीजवळ पोचण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात फारसा प्रभाव जाणवणार नाही.

थायलंडच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे अंदमान समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार झाले. त्याचे जवाद चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ही प्रणालीचे केंद्र आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पासून ४२० किलोमीटर, ओडिशाच्या गोपाळपासून ५३० किलोमीटर, तसेच पारदीपपासून ६५० किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात आहे. 

भारताच्या किनाऱ्याकडे येताना त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आज (ता. ४) हे चक्रीवादळ प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याजवळ पोचणार आहे. पूर्व किनाऱ्यावर येताच वादळी प्रणालीची दिशा बदलून ते ईशान्येकडे पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत आहेत. 

उद्या (ता. ५) दुपारपर्यंत हे वादळ ओडिशाच्या पुरीजवळ पोहोचणार असून, त्यानंतर ते पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये तशी ६० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.


इतर बातम्या
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...
सोयापेंडच्या सामान्य मागणीमुळे सोयाबीन...बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळी भोवती फिरत...
वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या बैठकीचा बार...वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)...
जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा मजबूत...पुणे - २०२२ मध्ये जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा (...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
...तर गावांना मिळणार ५० लाख पुणे - भारतासह जगात गेल्या दोन वर्षांपासून...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...