भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज भरकटले; किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा

निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा रत्नागिरी किनारपट्टीला बसत आहे. तुफानीवेगाने वाहणारे वारे, समुद्राची गाज यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा आला.
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज भरकटले; किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज भरकटले; किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा

चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा रत्नागिरी किनारपट्टीला बसत आहे. तुफानी वेगाने वाहणारे वारे, समुद्राची गाज यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. वादळी वारे झाडांना पिळवटून टाकत होते. काही घरांचे पत्रे, छप्पर उडून गेली. या वादळाने फायन वादळाची भयानकता पुन्हा जागवली. भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज भरकटल्याचे पहावयास मिळाले.

निसर्ग  चक्रीवादळाचा परिणाम रात्री आणि आज सकाळी रत्नागिरी किनारी भागात जाणवू लागला. वेगवान वारे वाहत आहेत. महावितरणने अनुचित प्रकार टाळण्यासाठी रात्रीच वीजपुरवठा खंडित केला. आज निसर्गचा मोठा तडाखा पहाटे बसला. घोंगावणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेगळा मिनिटात मिनिटाला वाढत होता.  ग्रामीण भागात त्याची तीव्रता अधिक होती. ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन आहेत. वाऱ्याचा जोर वाढल्याने समुद्रालाही प्रचंड उधाण होते. अजस्र लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा कालच प्रशासनाने दिल्या होत्या. हवामान विभागाकडून मिळाल्या सूचनेनुसार निसर्ग वादळ गोवा, सिंधुदुर्ग पासून पुढे सरकू लागले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असून दापोली, गुहागर, मंडणगड तालुक्यातील किनारी भागाकडे सर्वाधिक लक्ष लागले आहे. एनडीआरएफची दोन्ही पथके सुरक्षेसाठी तैनात केली आहेत. 

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव आणखी वादात जाण्याच्या शक्यतेने किनारी भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. रत्नागिरीच्या भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज भरकटले आहे. भगवती बंदरात जहाजाचा नांगर तुटल्याने जहाज भरकटले. मिरकरवाडा येथे भल्यामोठ्या २ जहाजांनी काल सायंकाळ नंतर आसरा घेतला होता. हे दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला असून जहाजाचा नांगर तुटला आहे. नांगर तुटल्याने तो जहाज भरकटत जात असल्याचे चित्र मिरकरवाडा, भगवती बंदरात पहायला मिळत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com