डी. वाय. पाटील कृषी संकुलामार्फत मतदान जनजागृती

डी. वाय. पाटील कृषी संकुलामार्फत मतदान जनजागृती
डी. वाय. पाटील कृषी संकुलामार्फत मतदान जनजागृती

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय व डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्यामार्फत तळसंदे गावामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम विविध पथनाट्य सादर करून झाला.

निवडणूक प्रशिक्षण म्हटले की मतदान प्रक्रियेबाबतची माहिती, ईव्हीएम हाताळणे, विविध कागदपत्रे यांची माहिती कायद्यांबाबतची माहिती यामुळे धीरगंभीर वातावरण असते. या सर्व माहितीसह ‘एका मताने काय फरक पडतो’ हे विनोदी पथनाट्य दाखवून विनोदी स्वरूपात मतदानाविषयी लोकांमध्ये मतदानाविषयी जागृती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी केली.

रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, तसेच हातकणंगलेच्या नायब तहसीलदार, शोभा कोळी, मंडळ अधिकारी सौ. खाडे, तळसंदे गावचे सरपंच अमर पाटील आदी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्रा. पी. डी. उके व दोन्ही महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. एस. एन. कोळेकर व प्रा. पी. एस. बंडगर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com