परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग लागवडीत खोडा

परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग लागवडीत खोडा
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग लागवडीत खोडा

परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि यंदाच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवड करणे अशक्य झाले आहे. जिल्ह्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत यंदा १२४ शेतकऱ्यांनी ११३ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांनी २ हजार १८३.१९ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी २ हजार ५७१ अर्ज दाखल केले. यामध्ये परभणी तालुक्यातून ४६७ शेतकऱ्यांनी ४८८.७ हेक्टरसाठी, जिंतूरमधून ५७२ शेतकऱ्यांनी ४१६.४३ हेक्टरसाठी, सेलूमधून ४९३ शेतकऱ्यांनी ४०७.३८ हेक्टरवर, मानवतमधून २१० शेतकऱ्यांनी २८० हेक्टरवर, पाथरीतून २४६ शेतकऱ्यांनी २०० हेक्टरवर, सोनपेठमधून ९४ शेतकऱ्यांनी ६०.०३ हेक्टरवर, गंगाखेडमधून ११२ शेतकऱ्यांनी ८२.४ हेक्टरवर, पालममधून २०७ शेतकऱ्यांनी १२५.४७ हेक्टरवर, पूर्णातून १७० शेतकऱ्यांनी १२६.४३ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले.

२०१८-१९ आणि २०१९-२० मधील मिळून एकूण १२ हजार १९५ अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३ हजार ६९१ शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पूर्वसंमती देण्यात आली. परंतु पाणी नसल्यामुळे फळबाग लागवड करणे शक्य नाही.

जुलैअखेरपर्यंत १२४ शेतकऱ्यांनी ११३.२ हेक्टरवर फळबाग लागवड केली. यामध्ये परभणीतील ५ शेतकऱ्यांनी ९ हेक्टरवर, जिंतूरमध्ये ३ शेतकऱ्यांनी ३.४ हेक्टरवर, सेलूमध्ये १९ शेतकऱ्यांनी २०.१० हेक्टरवर, मानवतमध्ये ६७ शेतकऱ्यांनी ५३.९० हेक्टरवर, पाथरीत १ शेतकऱ्याने १ हेक्टरवर, सोनपेठमध्ये १५ शेतकऱ्यांनी १३.५० हेक्टरवर, गंगाखेडमध्ये ४ शेतकऱ्यांनी ३.३० हेक्टरवर, पालममध्ये ३ शेतकऱ्यांनी ३ हेक्टरवर, पूर्णा तालुक्यात ७ शेतकऱ्यांनी ६ हेक्टरवर फळबाग लागवड केली. लागवड केलेल्या फळपिकांमध्ये पेरूची १५ हेक्टर, लिंबांची ३६.४ हेक्टर, आंब्याची १४ हेक्टर, संत्र्यांची ३४ हेक्टर, सीताफळांची ४.८ हेक्टर, मोसंबीची ६.७० हेक्टरवर लागवड करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com