Agriculture news in marathi Dadar sorghum in Khandesh, gram sowing delayed | Agrowon

खानदेशात दादर ज्वारी, हरभरा पेरणी रखडत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

जळगाव : खानदेशात कोरडवाहू पीक म्हणून प्रसिद्ध असलेली दादर ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी सुरू आहे. पंरतु, पाऊस, ढगाळ, आर्द्रतायुक्त वातावरणामुळे ही पेरणी रखडत सुरू आहे.

जळगाव : खानदेशात कोरडवाहू पीक म्हणून प्रसिद्ध असलेली दादर ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी सुरू आहे. पंरतु, पाऊस, ढगाळ, आर्द्रतायुक्त वातावरणामुळे ही पेरणी रखडत सुरू आहे. यंदा रब्बी पेरणी विक्रमी स्थितीत पोचेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

कोरडवाहू रब्बी पिकांची पेरणी गिरणा, तापी, पांझरा, अनेर नदीकाठी अधिक होते. दादर ज्वारी व हरभऱ्याची पेरणी दसरा सणापूर्वीच केली जाते. ही पेरणी मूग, उडीद पिकाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात केली जाते. या पेरणीला गेल्या आठवड्याच्या सुरवातीला धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर, जळगाव भागात वेग आला होता. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांत पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. तर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागात पाऊस आला. 

गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.१) व शुक्रवारी (ता.२) चोपडा, शिरपूर भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे वाफसा नाहिसा झाला. पेरणी सध्या रखडत सुरू आहे. शिंदखेडा तालुक्यातील विरदेल, मुळावद, बेटावद,  म्हळसर आदी परिसर कोरडवाहू दादर पिकासाठी प्रसिद्ध आहे. 

या भागात मजूरटंचाई व इतर कारणांमुळे ट्रॅक्टरच्या साह्याने गेल्या आठवड्याच्या सुरवातीला दादर ज्वारीची पेरणी झाली. काही शेतकऱ्यांनी तर बीबीएफ तंत्रज्ञानाचा उपयोगही दादर ज्वारीसाठी केला आहे. 

खानदेशात यंदा सुमारे साडेचार ते चार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अपेक्षित आहे. यात जळगाव जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी होईल. खानदेशात सर्वाधिक मका पिकाची लागवड होवू  शकते. या पाठोपाठ हरभरा व दादर ज्वारीची पेरणी होईल. 

ट्रॅक्टरच्या साह्याने कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी केली. बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यंदा आमच्या भागात दादर ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी होईल. 
- जितेंद्र पेंढारकर, शेतकरी, विरदेल (जि.धुळे)


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...