दादर कडब्याचे दर यंदा आवाक्यात 

खानदेशात अनेकदा दुरापास्त असणारा दादर ज्वारीचा कडबा यंदा मुबलक आहे. हा चारा अपवाद वगळता सर्वत्र यंदा उपलब्ध झाला आहे. त्याचे दर यंदा शेकड्यामागे ५०० रुपयांनी कमी आहेत.
jowar fodder
jowar fodder

जळगाव ः खानदेशात अनेकदा दुरापास्त असणारा दादर ज्वारीचा कडबा यंदा मुबलक आहे. हा चारा अपवाद वगळता सर्वत्र यंदा उपलब्ध झाला आहे. त्याचे दर यंदा शेकड्यामागे ५०० रुपयांनी कमी आहेत.  जेथे पेरणी कमी होती, त्या भागात दर स्थिर आहेत. परंतु इतर भागांत दर कमी झाले आहेत. यंदा दर प्रतिशेकडा ३५०० ते ४५०० रुपये, असे आहेत. २०१८ मध्ये दर पाच हजार रुपये प्रतिशेकडा, असे होते. २०१९ मध्येही दर स्थिर होते. पण गेले दोन हंगाम पेरणी चांगल्या पावसाने अपेक्षेएवढी झाली. परिणामी, दादरचा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला. खानदेशात यंदा दादरची पेरणी सुमारे ३२ हजार हेक्टरवर झाली होती. दुधाळ पशुधनासह बैलजोड्यांसाठी दादरच्या कडब्याची खरेदी शेतकरी करतात. दादरची पेरणी यंदा सर्वत्र झाली होती. कोरडवाहू व सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या दादरचे चांगले उत्पादन येत असून, कडबाही मुबलक आहे. त्याची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या कडब्याची आगाऊ नोंदणी खरेदीदारांनी करून ठेवली होती. चोपडा तालुक्यात ३००० ते ३२०० रुपये प्रतिशेकडा दर दादरच्या कडब्याला आहे. कडबा खरेदी केल्यानंतर संबंधित शेतातच त्याची कुट्टी करून कुट्टीची वाहतूक खरेदीदार करून घेत आहेत. दादरचा कडबा जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर या भागांत कमी उपलब्ध आहे. परंतु इतर भागांत हा कडबा बऱ्यापैकी उपलब्ध आहे. धुळ्यात धुळे, शिंदखेडा व शिरपुरात दादर कडबा मुबलक प्रमाणात आहे. 

मका कडबा दरात वाढीची शक्यता  दादरचा कडबा मुबलक आहे. परंतु मक्याचा कडबा मात्र कमी उपलब्ध आहे. त्याचे दर अद्याप जाहीर झालेले नाहीत. परंतु चोपडा, शिरपूर भागात काही शेतकऱ्यांच्या आगाप लागवडीच्या मका पिकाच्या चाऱ्याचे दर आठ हजार रुपये एकर, असे जाहीर झाले आहेत. एक एकरात किमान ४०० पेंढ्या मक्याचा कडबा उपलब्ध होत असतो. यंदा मका कडब्याच्या दरात काहीशी वाढ होईल, असे दिसत आहे. कारण त्याची लागवड कमी झाली होती. मक्याच्या कडब्याची साठवणूक अनेक शेतकरी आपल्या पशुधनासाठी करून घेतात. या कडब्यात दादर, बाजरी पिकाच्या कडब्याची कुट्टी घालून मिश्रण तयार करतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com