मराठवाड्यात दूध संकलनात प्रतिदिन घट

औरंगाबाद : मराठवाड्यात प्रतिदिन दूध संकलनाचा आलेख घटताच आहे. जूनअखेरीस प्रतिदिन ९ लाख ९५ हजार लिटर होणारे दूध संकलन जुलैअखेरीस ९ लाख ९४ हजार लिटर प्रतिदिनवर आले.
 Daily decline in milk collection in Marathwada
Daily decline in milk collection in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यात प्रतिदिन दूध संकलनाचा आलेख घटताच आहे. जूनअखेरीस प्रतिदिन ९ लाख ९५ हजार लिटर होणारे दूध संकलन जुलैअखेरीस ९ लाख ९४ हजार लिटर प्रतिदिनवर आले. अनुकूल स्थितीत शेतीपूरक दुग्ध व्यवसायातील दूध संकलनातील घट चिंता वाढविणारी मानली जात आहे.

एप्रिल ते मार्च २०१९-२० दरम्यान मराठवाड्यात प्रतिदिन सरासरी ८ लाख ९९ हजार लिटर दूध संकलन केले गेले. गतवर्षी जुलैअखेर दुष्काळाने त्यात घट आली होती. जवळपास ८ लाख ९ हजार लिटर प्रति दिन दूध संकलन केले जात होते. एप्रिलमध्ये प्रतिदिन दूध संकलन ११ लाख २७ हजार लिटरवर पोहोचले होते. मे महिन्यात प्रतिदिन ११ लाख १ हजार लिटरवर संकलन आले.

जूनमध्ये हा आकडा प्रतिदिन ९ लाख ९५ हजार लिटरवर आला होता. जुलै अखेरच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातून शासकीय दुध डेअरीचे संकलन ३३ हजार लिटर, सहकारी डेअरींचे ३ लाख ४८ हजार लिटर, तर खासगी दूध डेऱ्यांचे संकलन ६ लाख १३ हजार लिटर प्रतिदिन झाले. जून महिन्याच्या तुलनेत जुलैअखेरीस शासकीय व खासगी डेअरींच्या किंचित वाढ, तर सहकारी दूध डेरीच्या किंचित घट नोंदली गेली आहे. दूध उत्पादकांच्या आक्रमक भूमिकेमुळे दूध संकलनावर परिणाम झाला होता.

संकलित दुधापैकी १ लाख ९४ हजार लिटर पॅकिंग करून विकले जात आहे. जवळपास १ लाख ५ हजार लिटर दूध राज्याबाहेर विक्रीसाठी जाते. एकूण वितरणापैकी १ लाख ६ हजार लिटर दूध महानंद मुंबईला वितरण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com