agriculture news in marathi, daily economy of fodder camp, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला सव्वादोन कोटींचा खर्च
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी आतापर्यंत ४५८ जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या आहेत. त्यात दोन लाख ८३ हजार जनावरे आहेत. त्यावर दर दिवसाला सुमारे दोन कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये खर्च केले जात आहेत. जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू झालेल्या असल्या तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र कसरत सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. 

नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी आतापर्यंत ४५८ जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या आहेत. त्यात दोन लाख ८३ हजार जनावरे आहेत. त्यावर दर दिवसाला सुमारे दोन कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये खर्च केले जात आहेत. जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू झालेल्या असल्या तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र कसरत सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाणी नसल्याने जवळपास आठ तालुक्यांत शेती कोरडी पडलेली आहे. आता केवळ पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवणे हाच एकमेव उद्देश आहे. जिल्ह्यात दुभत्या जनावरांची संख्या सतरा लाख आहे. दुष्काळामुळे दावणीला बांधलेल्या पशुधनाचे संगोपन करण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. चारा छावणीसाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल होत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे पशुधनासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष आहे.

छावण्यांची तपासणी करण्यासाठी ३२ पथके तैनात करण्यात आली आहेत. यावर्षी पाणी व चाऱ्याची स्थिती हिवाळ्यातच भीषण झाली. त्यामुळे सरकारला पशूंसाठी छावण्या सुरू कराव्या लागल्या. यापैकी काही छावण्यांमध्ये गैरप्रकारही होत असल्याचे तपासणीत उघड झाले. आतापर्यंत पशुसेवेत कुचराई करणाऱ्या छावणीचालकांना लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे नगर तालुक्‍यातील छावणीचालकांच्या संघटनेने मध्यंतरी प्रशासनाला निवेदन देत हे दंड मागे घेण्याची मागणी केली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या दंडामुळे छावणीचालक पशूंची काळजी घेत आहेत.

अर्थात आता ‘महसूल’चे लोक मतदान प्रक्रियेत गुंतलेले आहेत, त्यामुळे मतदान प्रक्रिया संपल्यावर पुन्हा छावण्यांच्या तपासणीचे सत्र सुरू होईल. अर्थात आतापर्यंत ठोठावलेल्या दंडामुळे पशुसेवेत कुचराई करण्याचे प्रकार पुन्हा होणार नाहीत, अशी प्रशासनाला आशा आहे. दर दिवसाला पशुधन जगविण्यासाठी सव्वादोन कोटी रुपये एप्रिलमध्येच खर्च करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 

छावणीत ७० हजार पशुपालकांचा मुक्काम 
छावणीत पशुधनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ४५८ छावण्यांत दोन लाख ८३ हजार ४५२ पशुधन दाखल झाले आहे. या पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी ७० हजार पशुपालकांचा मुक्काम छावणीत आहे. श्रीगोंदे तालुक्‍यात तर छावणीत विवाहही पार पडला होता. छावणी हे एक प्रकारचे वसवलेले गावच बनले आहे. हे गाव अजून किमान अडीच महिने तसेच राहणार आहे.  

तालुकानिहाय सुरू असलेल्या छावण्या ः पाथर्डी -१०१, कर्जत - ८८, जामखेड - ५७, नगर - ५९, पारनेर - ४०, शेवगाव - ५९, श्रीगोंदे - ५४.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...