agriculture news in Marathi daily routine of vitehal rukmini Maharashtra | Agrowon

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपुजा, नित्योपचार सुरु

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दररोजचे नित्योपचार थांबविण्यात येत असतात. या कालावधीत देवाचा पलंग काढून श्री विठ्ठलास लोड व रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आलेला असतो. 

सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दररोजचे नित्योपचार थांबविण्यात येत असतात. या कालावधीत देवाचा पलंग काढून श्री विठ्ठलास लोड व रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आलेला असतो. आषाढी वारीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी अखंड २४ तास भक्तांना दर्शन देण्यासाठी उभे असतात,  या भावनेने श्री विठ्ठल-रुक्णिमणीमातेचा थकवा घालविण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते. कोरोनामुळे यंदा वारी झाली नसली, तरी परंपरेनुसार यंदाही  गुरुवारी (ता.९) पूजा करण्यात आल्यानंतर मंदिरातील नित्योपचार पुन्हा सुरु करण्यात आले.   

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते ही पुजा झाली. प्रक्षाळ पूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस नित्यपूजा, पहिले स्नान, महाअभिषेक, पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. त्यानंतर महानैवेद्य व आरती, धुपारती, शेजारती असा नित्य क्रमाने प्रक्षाळ पूजा झाली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.  आता शुक्रवारपासून (ता.१०) श्री विठ्ठलावरील रोजचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली. 

चौदा पदार्थांपासून बनविला काढा
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा थकवा दूर व्हावा, यासाठी खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदाम, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात आला होता़.  विठ्ठलाला आलेला शिणवटा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगण्यात आले़.


इतर अॅग्रो विशेष
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...