पंढरपुरात दररोज दोन हजार भाविकांना श्री विठ्ठल दर्शन

पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने रोज दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपुरात दररोज दोन हजार भाविकांना श्री विठ्ठल दर्शन
पंढरपुरात दररोज दोन हजार भाविकांना श्री विठ्ठल दर्शन

सोलापूर : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने रोज दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र मंदिरातील नित्योपचार मात्र सुरूच होते. आता मंदिर उघडण्यात आले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल- रुक्मिणीचा गाभारा, श्री विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविक, भक्तांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. या वेबसाइटवर करा नोंदणी श्री विठ्ठल दर्शनासाठी http://www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेत स्थळावर बुकिंग भाविकांनी करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

भाविकांसाठी नियमावली

  • सकाळी सहा ते रात्री नऊ वेळेत २००० भाविकांना मुख दर्शन घेता येणार
  • प्रति तास २०० भाविकांना दर्शनाकरिता सोडणार
  • ऑनलाइन दर्शन बुकिंग करावे लागणार- भाविकांनी २४ तास अगोदर ऑनलाइन बुकिंग करावे.
  • बुकिंग आठ दिवसांपर्यंत करता येणार
  • मुख दर्शनाकरिता कासार घाट येथे पास तपासणी करून दर्शनाला सोडणार
  • कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांना दर्शन प्रवेश बंद
  • ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com