रोज दोन हजार टन द्राक्षे तासगावातून देशभर रवाना

grapes
grapes

सांगली: या वर्षी द्राक्ष हंगाम दराकडून समाधानकारक नसला तरी तासगाव परिसरातून रोज १ हजार ७०० ते २ हजार टन द्राक्षे देशभरातील बाजारपेठांत रवाना होत आहेत. सुमारे २०० छोटी, मोठी वाहने आणि प्रचंड मनुष्यबळ त्यासाठी राबताना दिसत आहे. या वर्षीचा द्राक्ष हंगाम तसा शेतकऱ्यांसाठी अडचणीचाच आहे. कमी दर आणि वजनाची समस्या भेडसावत असली तरी वेलीवर द्राक्षे ठेवून शेतकऱ्यांना दराची वाट पाहत बसता येत नाही. तालुक्‍यातून मुंबई, दिल्ली, बंगळूर, कोलकता, चेन्नई, अहमदाबाद या मुख्य बाजारपेठांसह यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, ओरिसा, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात द्राक्षे सुरू झाली आहेत. तासगाव, मणेराजुरी आणि सावळजसह या तीन प्रमुख ठिकाणी सर्व भागातून द्राक्षे एकत्र करून देशभरात रवाना होत आहेत. पिकअप व्हॅनपासून १६ टनांचे मोठे ट्रक अशी सुमारे २०० ते २५० वाहने अखंड धावत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि काही प्रमाणात बंगळूर वगळता दूर अंतराच्या वाहतुकीसाठी १६ टन क्षमता असलेल्या वाहनातून द्राक्षे वाहतूक केली जातात. मागणी, अंतराचे गणित बांधून इकडे गाड्या लोड केल्या जातात. तासगाव, वाळवा आणि पलूस तालुक्‍यातील सुमारे २ हजार टनांपेक्षा अधिक द्राक्षे बाजारात सुरू आहेत. द्राक्षे वेली वरून तोडल्यापासून चौथ्या दिवसापर्यंत पश्‍चिम बंगाल, बांगलादेश, उत्तराखंडपर्यंत पोहोच होण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले  जातात. दुबई, श्रीलंका, युरोप, अन्य आखाती देशात द्राक्षे पाठवण्याची यंत्रणा वेगळी काम करते. या वर्षी वातानुकूलित कंटेनरची घरघर लक्षणीय कमी आहे. वाहतूक खर्च कोलकत्ता, ओरिसासाठी सात हजार रुपये टन, पटणा दहा हजार रुपये टन, दिल्ली नऊ हजार रुपये टन असा आहे. अंतर वाढेल तसा वाहतूक खर्च वाढतो. अंतर वाढेल तसे वाहन बदलते. प्रत्येक ट्रकवर दोन चालक काम करतात. मोठे ट्रक त्या त्या राज्यातून व्यापारी घेऊन आलेले असतात. त्यावर चालक, क्‍लिनरसह यंत्रणा त्याच भागातील असते. नॉनस्टॉप...सकाळी सात ते रात्री आठ द्राक्ष तोडण्यापासून ते निवडून वजन करून पॅकिंग करून गाडीत लोड करेपर्यंत सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शेकडो हात काम करताना दिसत आहेत. द्राक्षे निवडून वजन करणे, पॅकिंग करणे, प्रत्येक द्राक्ष व्यापारी स्वतःचे कामगार आणतो. त्यांची मजुरी शेतकऱ्याला द्यावी लागते. अनेकदा कामगार त्या त्या राज्यातील असतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com