Agriculture news in marathi dairy business provide economical supports to house | Agrowon

दुग्ध व्यवसायाने घराला आधार

अभिजित डाके
सोमवार, 1 जून 2020

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. अल्पभूधारक ते दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या दावणीला हमखास दुधाळ जनावरे बघायला मिळतील. यामुळे पशुपालकांना दहा दिवसाला पैसा देणारा आणि हमीचा व्यवसाय बनला आहे. या दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती केलीच त्याचबरोबर सधनता आली.
 

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. अल्पभूधारक ते दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या दावणीला हमखास दुधाळ जनावरे बघायला मिळतील. यामुळे पशुपालकांना दहा दिवसाला पैसा देणारा आणि हमीचा व्यवसाय बनला आहे. या दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती केलीच त्याचबरोबर सधनता आली.

सांगली जिल्ह्यात गायी, म्हशी मिळून सुमारे ६ लाख ६७ हजार ६३५ हून अधिक जनावरे आहेत. दररोज सुमारे १५ लाख दुधाचे संकलन होते. जिल्ह्यात दुधाची क्रांती झाली आहे. जिल्ह्यात सहकारी १७ तर खासगी ७ दूध संघ आहेत. सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काळात गायी म्हशी संगोपनाचे प्रमाण प्रमाण वाढले आहे. परिणामी दूध उत्पादनही वाढले आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, देशी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी संगोपन केले जाते. दुग्ध व्यवसायात गेल्या काही वर्षापासून बदल झाले आहेत. हा प्रमुख व्यवसाय झाला आहे. अनेक युवा शेतकरी गायी, म्हशींचे मुक्तसंचार पद्धतीने संगोपन करत आहेत. यामुळे निश्‍चितपणे पशुपालन हा शाश्‍वत व्यवसाय बनला आहे.

वास्तविक पाहता अल्पभूधारकापासून चार ते पाच एकर शेती असणारे शेतकरी पशुपालनाकडे वळला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना पशुपालन हा चांगला व्यवसाय ठरला आहे.

मुळात दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगाव आणि खानापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे दोन चार जनावरे दावणीला बांधलेलीच असतात. पशुपालन आणि दूध विक्रीतून कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाला. परिणामी सर्वबाजूंनी येणारा पैसा थांबला. या काळात दुग्ध व्यवसायाने कुटुंबाला चांगला आर्थिक दिला.

देशी गायींना महत्व
देशी गायी आपली बलस्थाने ठरू शकतात. देशी गायींच्या दुधाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. शेण आणि गोमूत्राचा वापर शेतीमध्ये फायदेशीर ठरतो.

शेतकऱ्यांनी अतिशय काटेकोर पद्धतीने दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. तसे पाहिलं तर हा व्यवसाय बारमाही आहे. फक्त जनावरांची योग्य काळजी घ्यावी लागते. या उद्योगाला स्थिरता देण्याचे काम शेतकऱ्यांनीच केले आहे. दुग्ध व्यवसायावर अनेक उद्योग सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात हा व्यवसाय प्रामुख्याने महिला सांभाळतात. शेतकऱ्यांना यातून चांगले अर्थार्जन होत आहे.
- अजितराव घोरपडे
माजी मंत्री, महाराष्ट्र


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...
सापळा पिकांची लागवड महत्त्वाचीएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापनयवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
विक्री केंद्रांद्वारे सेंद्रिय भाजीपाला...हिंगोली : ‘‘मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी...
हिंगोलीत व्यापारी, खासगी बॅंकांकडून १५...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता....
पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून...औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन...
सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख...सोलापूर  : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे...
सोलापूर जिल्हा भूमि अभिलेखने मिळवला ३०...सोलापूर  : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसआरआय`ने होणार...सिंधुदुर्ग : राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि...