Agriculture news in marathi Dairy business in Sangli on the verge of closure | Agrowon

सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या दरामुळे संकटात सापडला आहे. त्यातच दूधाच्या दरातील घसरणीचा फटकाही दूग्ध व्यवसाला बसला आहे.

सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या दरामुळे संकटात सापडला आहे. त्यातच दूधाच्या दरातील घसरणीचा फटकाही दूग्ध व्यवसाला बसला आहे. गोठ्यातील जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे हा शेती पूरक हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची भावना दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात सुमारे खासगी १४ संघ, तर सहकारी ७ आणि मल्टीस्टेट संघ १२ असे एकूण ३३ संघ आहेत. जिल्‍ह्यात प्रतिदिन १५ ते १६ लाख लिटर दूधाचे संकलन होते. जिल्ह्यातील दररोज संकलनात २५ ते ३० हजार लिटरची घट झाली आहे. मुळात दुष्काळी पट्ट्यात  प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता येवू लागली आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात गाईच्या ३.५ फॅटला सरासरी ३२ रुपये असा दर मिळत होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याचा परिणाम पशूखाद्याच्या दरांवरही झाला. याचा फटका दूधाला देखील बसला. दूध, आणि दूधाच्या पदार्थांची मागणी घटली. 

सातत्याने चारा, पशुखाद्यात होणारी दर वाढ, यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी पिचला आहे. सध्या दुष्काळी गाईच्या दुधाला पट्ट्यात ३.५ फॅटला १९ रुपये दर मिळतो आहे.  तर, जिल्ह्याच्या पश्चिम भागात गाईच्या दूधाला ३.५ फॅटला २५ रुपये असा दर मिळाला. याचाच अर्थ असा की, सहकारी आणि खासगी दूध संघांनी जिल्ह्यात गाईच्या दूधाचे दोन दर केले आहेत. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. जिल्ह्यात दूधाचे संकलन २५ हजार लिटरने घटले असले तरी, बाजारात दूधाला मागणी कमी आहे. 

म्हशीच्या दूधाला ३७ रुपये असा दर मिळतो आहे. त्यामध्ये फॅट कमी असेल, तर दर कमी होतो. सहकारी आणि खासगी दूध संघांकडून दूधाची बिले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न आहे. या साऱ्या अडचणीमुळे मोठे गोठा पालन करणाऱ्या पशूपालकांनाकडून जनावरांची विक्री सुरु झाली 
आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...