Agriculture news in marathi, Dairy milk collection in Parbhani decreases | Agrowon

परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात १ लाख ९४ हजार ८९ लिटरने घट झाली आहे. गतवर्षीच्या (२०१८) सप्टेंबरच्या तुलनेत यंदा या महिन्यातील दूध संकलनात ३ लाख ९४ हजार ४९४ लिटरने घट झाली. या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर एवढे दूध संकलन झाले.

परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात १ लाख ९४ हजार ८९ लिटरने घट झाली आहे. गतवर्षीच्या (२०१८) सप्टेंबरच्या तुलनेत यंदा या महिन्यातील दूध संकलनात ३ लाख ९४ हजार ४९४ लिटरने घट झाली. या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर एवढे दूध संकलन झाले.

दुष्काळी स्थितीमुळे उद्भवलेली चाराटंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, पेमेंट मिळण्यास लगत असलेला विलंब आदी कारणांनी दूध व्यवसाय बंद पडत असल्यामुळे दुग्ध संकलनात घट होत आहे.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात येथील दुग्ध शाळेत परभणी, पाथरी, गंगाखेड, हिंगोली, नांदेड येथील शीतकरण केंद्रातून एकूण ९ लाख ७३ हजार ७१९ लिटर दूध संकलन झाले होते.

सप्टेंबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर दूध संकलन झाले. यामध्ये परभणी येथील शीतकरण केंद्रांतील २ लाख ९२ हजार ६०२ लिटर, पाथरी येथील २ लाख ६२ हजार ३१६ लिटर, गंगाखेड येथील १ लाख ३६ हजार ९८५ लिटर, हिंगोली येथील ५९ हजार ४६५ लिटर, नांदेड येथील २७ हजार ५१७ लिटर दुधाचा समावेश आहे.
सप्टेंबर महिन्यात नांदेड वगळता अन्य ठिकाणच्या दूध संकलनात घट झाली.

नांदेड जिल्ह्यातून ऑगस्ट महिन्यात २० हजार ३४८ लिटर, सप्टेंबर महिन्यात २७ हजार ५१७ लिटर दूध संकलन झाले. गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात १० लाख १९ हजार ७८८ लिटर, सप्टेंबर महिन्यात ११ लाख ७९ हजार १२४ लिटर दूध संकलन झाले. गतवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये ३ लाख ९४ हजार ४९४ लिटरने घट झाली. २०१९ -२० या आर्थिक वर्षात दुधाचे पेमेंट मिळण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे.

सहकारी दूध उत्पादक संस्थाचे कमिशन तसेच वाहतूक खर्चीचे बिल थकीत आहे. याशिवाय चाराटंचाई, चारा, सरकी पेंडीच्या दरात वाढ झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची विक्री करून दुग्ध व्यवसाय बंद केले. त्यामुळे दूध संकलनात दर महिन्यात घट होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...