Agriculture news in Marathi Dairy in Nagar district in trouble | Agrowon

नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

नगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाल्यापासून दूध खरेदीचे दर कमी करण्यात आले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून सध्या गायीच्या दुधाला सरासरी १५ ते १८ रुपये लीटर असा दर मिळत आहे. मात्र पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत वाढले असल्याने उत्पादन खर्चही निघत नसून दूध व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

नगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाल्यापासून दूध खरेदीचे दर कमी करण्यात आले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून सध्या गायीच्या दुधाला सरासरी १५ ते १८ रुपये लीटर असा दर मिळत आहे. मात्र पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत वाढले असल्याने उत्पादन खर्चही निघत नसून दूध व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. खासगी संघांपेक्षा सहकारी संघ जास्त दर देत असले तरी आता सहकारी संघही दुधाचे दर कमी करू लागले आहेत. या स्थितीमुळे जिल्ह्यातील दोन लाखांपेक्षा अधिक दुग्धोत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

जिल्ह्यात  मागील सहा महिन्यांपूर्वी दुधाला चांगला दर मिळत होता. मात्र, ‘कोरोना’चे संकट आले आणि दुधाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत खासगी संघांनी दूध दरात कपात केली. सद्यःस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील खासगी दूध संघांकडून गायीच्या दुधाला १५ ते २० रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ ते ६० रुपये लीटर असा दर मिळत आहे. म्हशीचे बहुतांश दूध हे शेतकरी थेट ग्राहकांना वितरित करतात, मात्र गायीच्या  दुधाचे उत्पादन घेणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे.

काही संघांकडून वेळेवर तर काही संघांकडून पंधरा दिवस उशिराने दूध विक्रीचे पैसे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खासगी संघांपेक्षा सहकारी संघांमध्ये दुधाला जास्त दर दिला जात असला तरी सहकारी संघांत केवळ पंचवीस टक्के दूध खरेदी होत आहे. उत्पादित होणारे सर्व दूध संकलित होत असले तरी दुधाचा प्रश्न वरचेवर जटिल होत असून त्याकडे सरकारचे फारसे लक्ष नसल्याचे दिसून येते.

आम्ही खासगी संघाला दूध घालतो. दर कमी झाल्याने आता मोठा तोटा सोसावा लागत आहे. दुधाला मिळणारा दर कमी आणि पशुखाद्याचे दर वाढल्याने हा व्यवसाय अडचणीचा झाला आहे. दूध दरात सुधारणा झाली नाही तर अनेक शेतकरी हा व्यवसाय बंद करतील.
- शंकर सपकाळ, दूध उत्पादक, मानोरी, जि. नगर.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...