..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रिया

dal mill
dal mill

मागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ मिल निर्मितीची प्रक्रिया आपण पाहिली. ही प्रक्रिया कशी होते ते या भागात ग्राफिकच्या माध्यमातून समजावून घेऊया. मिनी डाळच्या माध्यमातून कडधान्यांवर प्रक्रिया करून डाळी निर्मितीचा उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मागील भागात आपण डाळींचे महत्त्व, बाजारपेठा, प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेतली. या भागात डाळ निर्मितीची प्रक्रिया ग्राफिकच्या माध्यमातून समजावून घेऊया. डाळ निर्मिती कच्चा माल       l क्लिनिंग----(काडी, दगड, माती)       l प्रतवारी (ग्रेडिंग)       l अंशतः पाण्यामध्ये भिजविणे (वॉटर सोकिंग) (३ ते ४ तास)      l रेड पावडर (रेड अर्थ) सोबत मिक्सिंग (५ टक्के)----(चांगला पिवळा रंग येण्यासाठी आणि डाळीवरचे काळे डाग काढण्यासाठी)       l रात्रभर कंडिशनसाठी ठेवणे      l उन्हामध्ये वाळवणे (३-४ दिवस)      l  चाळणीद्वारे रेड पावडर वेगळी करणे (सिविंग)      l  द्विदल धान्य वेगळे करणे (डिहस्किंग, स्प्लिटिंग)---(हस्क आणि पावडर)      l चाळणी (सिविंग)---- हस्क आणि पावडर वेगळी करणे      l   डाळ     l चकाकी/पॉलिशिंग--- (बेल्टचा वापर करून )      l (पाणी/जवस तेल) ५% (कमी अधिक प्रमाण)      l   पॅकिंग आवश्‍यक यंत्रसामग्री

  • ऑटोमॅटिक डाळ मिल  
  • छिलका काढण्याचे यंत्र  
  • डाळ पॉलिशिंग  
  • स्टोरेज टॅंक  
  • तेलाचा वापर करण्याचे यंत्र  
  • ऑटोमॅटिक पॅकिंग  
  • वजन काटा  
  • अन्य उपकरणे  
  • उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ- ४ ते ५  
  • वीज- १५ किलोवॉट
  • उद्योगासाठी लागणारे लाइसेन्स

  • स्थानिक संस्थेचे संमती पत्र/सटिफिकेट  
  • उद्योग आधार  
  • एफएसएसएआय अर्थात ‘फूट सेफ्टी’विषयक संस्थेकडे नोंदणीकरण  
  • पॅकिंग लाइसेन्स  
  • ब्रँड रजिस्ट्रेशन (गरज असल्यास)
  • अनुदान या व्यवसायासाठी सरकारी अनुदानाचा लाभ घेता येतो. कृषी विभागामार्फत प्रकल्प अहवाल सादर करून मान्यता घ्यावी लागते. या योजनेत प्रकल्प अहवालात दर्शवलेल्या किमतीच्या २५ टक्के किंवा ५० लाख प्रति प्रकल्प असे जे कमी असेल ते अनुदान मिळू शकते. योजनेनुसार अनुदानाची किंमत बदलू शकते. अन्य मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पांसाठी खालील संस्थांकडून अनुदान मिळवता येऊ शकते.

  • सेंट्रल स्पॉन्सरड स्कीम (सीएसएस)  
  • नॅशनल मिशन फूड प्रोसेसिंग (एनएमएफपी)  
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी)  
  • नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड (एनएचबी)  
  • मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज
  • संपर्कः राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७ लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ञ आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com