Agriculture news in marathi In the dam area of Pune district Rain showers | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा धुमाकूळ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. प्रामुख्याने धरणक्षेत्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४०० मिलिमीटर पाऊस पडला.

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. प्रामुख्याने धरणक्षेत्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४०० मिलिमीटर पाऊस पडला. धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. नीरा देवघर धरणात चोवीस तासांत तब्बल ३.१८, तर भाटघर धरणात २.३३, पानशेत धरणात १.४४ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली. खडकवासला, वडज, कळमोडी, वडिवळे या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रात्रीसह दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. काही वेळा अधूनमधून पावसाची उघडीप होत असून, पुन्हा जोर धरत पाऊस बरसत आहे. मुळशीतील माले येथे ३३२ मिलिमीटर, मावळातील लोणावळा येथे ३२२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे पश्चिम पट्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे ओढ्याच्या व नदीच्याबाहेर पाणी जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. 

पुणे शहरातही पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. तर कोथरूड, खडकवासला, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, वाघोली, मुळशीतील थेरगाव, भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, मावळमधील तळेगाव, वेल्ह्यातील आंबवणे, जुन्नरमधील जुन्नर, नारायणगाव, डिंगोरे, आपटाळे, ओतूर खेडमधील वाडा, राजगुरूनगर, कुडे, पाईट, चाकण, कडुस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, अशा विविध ठिकाणी हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे पिकांना चांगलाच दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी नुकसान झाले आहे. पूर्व भागात पावसाने उघडीप असून, ढगाळ वातावरण आहे. 

विविध ठिकाणी शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे : स्रोत कृषी विभाग 
पौड १५५, घोटावडे १०१, मुठे २७०, पिरंगुट १०५, निगुडघर १४२, काले २२७, कार्ला २०५, खडकाळा १८७ , शिवणे १४०वेल्हा २०५, पानशेत १७०, विंझर १६३, 
राजूर १५०, 

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता.२२) सकाळी आठवाजेपर्यंतच्या चोवीस झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये
पिंपळगाव जोगे १५, माणिकडोह ७९, येडगाव २, वडज ३५, डिंभे ४३, कळमोडी ४२, चासकमान १२, भामाआसखेड २४, वडिवळे २१४, आंध्रा ७५, पवना २२७, 
कासारसाई २४४, टेमघर २७०, वरसगाव १७०, पानशेत १७०, खडकवासला २०, गुंजवणी १७१, नीरा देवघर १४२, भाटघर ९, वीर २, चिल्हेवाडी ६. 
 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...