agriculture news in marathi, dam Fill up; The water level of rivers decreases | Agrowon

कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची पाणीपातळी घटली
राजकुमार चौगुले
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील नद्यांची पातळी सरासरी तब्बल वीस ते पंचवीस फुटांनी कमी झाली आहे. ज्या नद्या पंधरा दिवसांपूर्वी धोकादायक पातळीवरून वाहत होत्या. त्या नद्या आता कोरड्या पडू लागल्याचे अविश्‍वसनीय चित्र दिसत आहे. काही नदीपात्रांमध्ये तर एका काठावरून दुसऱ्या काठावर चालत जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि नद्यांची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्याचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच व्यस्त झाले आहे.

कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील नद्यांची पातळी सरासरी तब्बल वीस ते पंचवीस फुटांनी कमी झाली आहे. ज्या नद्या पंधरा दिवसांपूर्वी धोकादायक पातळीवरून वाहत होत्या. त्या नद्या आता कोरड्या पडू लागल्याचे अविश्‍वसनीय चित्र दिसत आहे. काही नदीपात्रांमध्ये तर एका काठावरून दुसऱ्या काठावर चालत जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि नद्यांची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्याचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच व्यस्त झाले आहे.

जलसंपदा विभागाने मात्र याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जोपर्यंत शेतकरी व स्थानिक पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत मागणी येत नाही, तोपर्यंत आम्ही पाणी सोडणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.

पंधरवड्यात पालटली पाण्याची स्थिती
पावसाळा सुरू झाल्यापासून पश्‍चिम भागात सातत्याने पाऊस सुरू झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून बहुतांशी नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सतत पाऊस पडत असल्याने ऑगस्टमध्येच जिल्ह्यातील शंभर टक्के धरणे भरली. ऑगस्टच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणावरील ताण कमी करण्यासाठी पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ लागले. शंभर टक्के धरणे भरल्याने जास्तीत जास्त पाणी नद्याच्या पाणीपात्रात सोडण्यात येऊ लागले. राधानगरी धरणासारख्या स्वयंचलित दरवाजामधूनही आठवडाभर पाणी नदीपात्रात येत होते. यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. जिल्ह्यातील शंभर बंधारे पाण्याखाली गेले.

१ सप्टेंबरला कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २४ फूट, सुर्वे २३ फूट ४ इंच, रुई ५३ फूट ९ इंच, इचलकरंजी ५१ फूट ३ इंच, तेरवाड ४६ फूट ६ इंच, शिरोळ ४० फूट, नृसिंहवाडी ३८ फूट इतकी होती. पाऊस नसलेल्या पूर्व भागातही नद्यांच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. तर मंगळवारी (ता. १८) मिळालेल्या आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्यात ७ फूट, सुर्वे ११ फूट, रुई ३७ फूट २ इंच, इचलकरंजी ३३ फूट ३ इंच, तेरवाड ३२ फूट ६ इंच, शिरोळ २४ फूट, नृसिंहवाडी बंधाऱ्यात २३ फूट इतकी पाणीपातळी आहे.

अशी आहे सध्याची स्थिती
एक सप्टेंबरनंतर मात्र चित्र बदलले. पावसाळी हवामान कमी होऊन उन्हाचा तडाखा सुरू झाला. यामुळे पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडणे बंद केले. वारणा धरणातून केवळ ६०० तर दूधगंगा धरणातून ४०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...