agriculture news in marathi Dam stock in Nashik district at 46% | Page 3 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

नाशिक : रविवार (ता.१८) पासून पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा ४६ टक्क्यांवर गेला आहे.

नाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा अवघ्या २९ टक्क्यांवर आला होता. मात्र रविवार (ता.१८) पासून पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा ४६ टक्क्यांवर गेला आहे.

मंगळवार (ता.२७) अखेर १७ टक्के वाढ दिसून आली. तर जिल्ह्यातील भावली धरण १०० टक्के भरले आहे.
गंगापूर धरण समूहाचे मुख्य पाणलोट क्षेत्र त्रंबकेश्वर तालुक्यात आहे. त्यामध्ये गंगापूर, कश्यपी, गौतमी, गोदावरी व आळंदी या धरणांचा समावेश आहे. या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे समूहाचा पाणीसाठा ५९ टक्क्यांवर आला आहे.

पालखेड धरण समूहातील धरणांत  पाणीसाठा घटला होता. मात्र पावसाने कृपा केल्याने हा जलसाठा ५४ टक्क्यांवर गेला आहे. तर पावसाअभावी पुणेगाव, तिसगाव धरणे कोरडी आहेत. या भागाचे मुख्य पाणलोट क्षेत्र दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्यात आहे. येथे झालेल्या जोरदार पावसामुळे वाघाड धरणाचा टक्का ३० वर गेला आहे. 

इगतपुरीमध्ये पावसाने जोर धरल्याने दारणा, भावली, वालदेवी धरणात पाणी साठा वाढला आहे. त्यापैकी भावली धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यातील उत्तर पूर्व भागातील गिरणा धरण समूहातील हरणबारी धरणाच्या पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. तर माणिकपुंज, पुनद धरणात हळूहळू वाढ होत आहे. तर नागासाक्या धरण कोरडे झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा या मोठ्या धरण समूहात पाणीसाठा ४६ टक्क्यांवर गेला आहे.

‘दारणा, भावली’तून विसर्ग सुरू 

इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याचा येवा कायम आहे. त्यामुळे या दारणा धरणातून ३१९७ क्यूसेक, तर भावली पूर्ण भरल्याने येथून २०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत ४९७१ क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...