agriculture news in marathi, dam storage level status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांत १५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे  : जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली. उजनीसह जिल्ह्यातील धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता २१८.४० टीएमसी असून, सोमवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व २७ धरणांमध्ये मिळून सुमारे १४९.२३ टीएमसी (६८ टक्के) पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने उघडीप दिली असल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे.

पुणे  : जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली. उजनीसह जिल्ह्यातील धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता २१८.४० टीएमसी असून, सोमवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व २७ धरणांमध्ये मिळून सुमारे १४९.२३ टीएमसी (६८ टक्के) पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने उघडीप दिली असल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे.

राज्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या उजनी धरणांमध्ये १८.१२ टीएमसी (३४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उजनीतील अचल साठा विचारात घेता उजनीमध्ये ८१.७७ टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. पाऊस थांबला असला तरी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने उजनी आणि घोड या धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, आंद्रा आणि कलमोडी ही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत उर्वरित बहुतांशी धरणात ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. धरणांचा सांडवा आणि कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. यात टेमघर धरणातून ६००, पानशेतमधून ६२०, खडकवासलामधून १६४४, पवना धरणातून १४१३, चासकमान धरणातून ५७५, गुंजवणीमधून ४७४ आणि वीर धरणातून २३७७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : टेमघर २.५३ (६८), वरसगाव १०.०६(७८), पानशेत १०.६२ (९८), खडकवासला १.९७ (१००), पवना ८.२२ (९७), कासारसाई ०.५१ (९०), मुळशी १६.५१ (८९), कलमोडी १.५१ (१००), चासकमान ७.३९ (९८), भामा अासखेड ६.२२ (८१), आंद्रा २.९२ (१००), वडीवळे ०.९३ (८७), गुंजवणी २.२२ (६०), भाटघर १९.८९ (८५), नीरा देवघर ९.९६ (८५), वीर ९.०७ (७५९६), नाझरे ०.०३ (६), माणिकडोह ३.२२ (३२), ४.२३ (४२), वडज ०.६३ (५४), डिंभे १०.४७ (८४), घोड १.९७ (३६).


इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...