agriculture news in marathi, dam storage level status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. परिणामी सर्व धरणे भरून वाहिली. सध्या या सर्व धरणांत ७१ टक्क्यांवर पाणीसाठा उपलब्ध असल्याने तो लाभक्षेत्रातील गावांना फायदेशीर ठरणार आहे.  

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यांत दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे तुडुंब भरली होती. पाणीसाठा नियंत्रित राहाण्यासाठी कोयनेसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. यामुळे धरणातील पाणीपातळी समाधानकारक झाली होती. जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानाही धरणातील पाणीसाठा समाधकारक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. परिणामी सर्व धरणे भरून वाहिली. सध्या या सर्व धरणांत ७१ टक्क्यांवर पाणीसाठा उपलब्ध असल्याने तो लाभक्षेत्रातील गावांना फायदेशीर ठरणार आहे.  

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यांत दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे तुडुंब भरली होती. पाणीसाठा नियंत्रित राहाण्यासाठी कोयनेसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. यामुळे धरणातील पाणीपातळी समाधानकारक झाली होती. जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानाही धरणातील पाणीसाठा समाधकारक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोयना धरण हे राज्यासाठी वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असून यात सध्या ८१.३७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे वीजनिर्मितीसह शेतीसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. तसेच ऐन उन्हाळात वीज भारनियमनात केली जाणारी वाढ टाळता येणार आहे. तसेच कोयना नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांनादेखील पाणी उपलब्ध होणार आहे.

उरमोडी धरण माण, खटाव तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असून या धरणातही ७५.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळी तालुक्यात या धरणाचे अनेक ठिकाणी पाणी पोचले असून काही ठिकाणी कामे बाकी असल्याने पाणी पोचणार नाही. मात्र ज्या ठिकाणी पाणी पोचले आहे अशा ठिकाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.  
 

जिल्ह्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
धरण उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
कोयना ८१.३७ ८१.२७
धोम ८.३०  ७१.०४
कण्हेर ८.२४  ८५.८५
उरमोडी ७.२५ ७५.१७
तारळी   ५.०१   ८५.८५
धोम-बलकवडी २.८८   ७२.६२

 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...